आशाताई बच्छाव
पुणे (भोसरी) इंद्रायणीनगर येथे तीन दिवसीय ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन
(पुणे प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील)
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठानचे आयोजन सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री साई चौक मित्र मंडळ, श्री विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान व श्री वैष्णोमाता मंदिर समिती इंद्रायणीनगर, भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने १२ ते १४ मे २०२५ या कालावधीत ऐतिहासिक वस्तूंचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या संदर्भात पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी माहिती दिली. भोसरी इंद्रायणीनगर येथील वैष्णोमाता मंदिर प्रांगणात हे ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन होणार असून ते सकाळी १०.०० ते सायंकाळी – ९.०० वाजेपर्यंत खुले राहणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची नाणी, स्वराज्याचे स्वाभिमानी चलन शिवराई. मराठा साम्राज्यातील नाणी (१६७४ ते १८१८) विद्यार्थी व इतिहासप्रेमींना पाहता येणार आहेत. नाणी संग्रह किरणकुमार करांडे यांनी केलेला आहे.
संतोष चंदने यांनी संग्रहित केलेल्या ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रांचे देखील प्रदर्शन असणार आहे. यासह इतिहास अभ्यासक व संशोधक कुमार गुरव यांच्यामार्फत गौरवशाली मराठा आरमाराचे व जहाज प्रतिकृतीचे प्रदर्शन इथे असणार आहे. या मराठा आरमाराचा इतिहास प्रदर्शन रुपाने बहुमूल्य ठेवा जनतेसमोर ठेवला जाणार आहे..
प्रदर्शनाचे सोमवारी उद्घाटन ….
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभाग संघचालक माननीय आप्पासाहेब गवारे, आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकर भाऊ जगताप, आमदार उमाताई खापरे, आमदार अमितजी गोरखे, अमर दादा जाधवराव, पांडुरंग जी बलकवडे, मुकुंदराव कुलकर्णी, विलासजी लांडगे, बस्तीमलजी सोलंकी या सर्वांच्या हस्ते सोमवार दिनांक 12 मे 2025 रोजी सायंकाळी 5.45 मिनिटांनी संपन्न होणार आहे.
तसेच तिन्ही दिवस सायंकाळी 7.30 वाजता महाराजांची महाआरती संपन्न होणार आहे. सोबतच प्रयागराज कुंभमेळा येथील गंगाजल कलश पूजन व गंगा आरती होणार आहे. हे भव्य प्रदर्शन पाहण्यास आपण सहकुटुंब सहपरिवार,मित्रपरिवार यावे, असे आवाहन विलास मडिगेरी यांनी केले आहे.