आशाताई बच्छाव
जळगाव सपकाळ येथे धनश्रीची अग्नी वीर मध्ये निवड विद्यालयाच्या वतीने सत्कार
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील धनश्री वसु या मुलीचे अगदी वीर मध्ये एअर फोर्स मध्ये निवड झाली आहे. शिवनगरी जळगाव सपकाळ येथील शेतकरी कुटुंबातील मुलगी धनश्री वसु हिची भारतीय अग्नि विर एअर फोर्स मध्ये निवड झाली आहे त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन कौतुक होत आहे. धनश्रीचे शिक्षण प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगाव सपकाळ येथे झाले वर्ग ८ वी ते१२ ते या वर्गाचे शिक्षण वनय विद्यालयात झाले. सुरुवातीपासून ती शिस्त प्रिय व अभ्यासू विद्यार्थिनी होती घरची परिस्थिती हलाखीची असताना ही अभ्यासाच्या जोरावर तिने हे संपादन केले तिच्याबद्दल जिल्हा परिषद शाळा, विनय विद्यालयात सर्व स्टाफ सार्थ अभिमान आहे. शाळेच्या व गावच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला यावेळी बंडू सपकाळ, दीपक सपकाळ, पंजाब सपकाळ ,गजानन सपकाळ हे सर्व हे सर्व उपस्थित होते.