आशाताई बच्छाव
टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ यांचा विशेष प्रशस्तीपत्र देऊन सन्मान जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन खामगळ यांनी मागील कार्यकाळात विविध गुन्ह्यामध्ये सखोल चौकशी करत गुन्हेगारांना कठोर शासन देन्यासाठी केलेले कार्य,तथा पोलीस दलाची मान उंचावण्यासाठी केलेली उत्तम कामगिरी यासाठी,
भा.पो.से.आयुष नेपणी प्र.पोलीस अधीक्षक जालना यांच्याकडून प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ यांना देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये, टेंभुर्णी पोलीस स्टेशन मध्ये रजिस्टर गुन्हा नोंद क्रमांक 165 / 2018, कलम 302, 120-ब, 201, भादवि प्रमाणे गुन्हा नोंद असून सत्र खटला क्रमांक 32/2016 असा आहें, सदर पुण्यातील तपासणी अधिकारी व अंमलदार यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे, 30- 4- 2025, रोजी माननीय न्यायालयाने आरोपीस कलम 302 भारतीय दंडविधान मध्ये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा तसेच कलम 201 r/w, 120 – ब, भादवी मध्ये चार वर्ष बारा वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना प्रशासित पत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या पुढील कार्यामध्ये अशाच कार्याची अपेक्षा ठेवण्यात आलेली असून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. सपोनी सचिन खामगळ टेंभुर्णी पोलीस स्टेशनला रुजू झाल्यापासून विविध गुन्ह्यांमध्ये घट झालेली आहे त्याबद्दलही त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.