Home सामाजिक मातोश्री लक्ष्मीबाई रखमाजी राऊत पाटील…. (मातृदिनानिमित काही आठवणीतलं)

मातोश्री लक्ष्मीबाई रखमाजी राऊत पाटील…. (मातृदिनानिमित काही आठवणीतलं)

49
0

आशाताई बच्छाव

1001491262.jpg

मातोश्री लक्ष्मीबाई रखमाजी राऊत पाटील….
(मातृदिनानिमित काही आठवणीतलं)
आज ११ मे जागतिक मातृदिन! त्यानिमित्त माझ्या आईबाबत असलेल्या काही आठवणी शब्दबद्ध करण्याचा हा अल्पसा शब्दप्रवास..
माझ्या आईचे म्हणजे अक्काचे माहेर मालेगाव तालुक्यातील कौळाणे (निं) तर आईच्या मामाचे गाव कौळाणे जवळील व-हाणे हे असल्याने साहजिकच आईचे बालपणी या गावाला जाणे येणे होते.व तेथील आईचे मामा सुध्दा सणासुदीला व सुख दुःखाला सदैव येऊन जाऊन होते.पुढे माझ्या आईचा विवाह झाला आणि अहिल्या नगर जिल्ह्यातील ब्राम्हणी या गावी माझी आई लक्ष्मीबाई रखमाजी राऊत पाटील या नवीन नावाने ओळख घेऊन संसाराला लागली.माझे वडील कै.रखमाजी भाऊसाहेब राऊत पाटील हे अहिल्यानगर जिल्ह्यातीलच श्रीरामपूर येथे महाराष्ट्र शासनाच्या सेवेत नोकरीला होते.अगदी सुखा समाधानाचा संसार प्रपंच सुरू असताना माझ्या पेक्षा दोन मोठ्या भावाचे निधन झाले.त्यानंतर एका बहिणीचा जन्म झाला.आणि नंतर मग माझा जन्म २० आँक्टोबर १९७१ या दिवाळीच्या सणासुदीला झाला.मात्र संसार सुख माझ्या आईच्या नशिबी जास्तनव्हतेच, दुर्दैवाची घटना अशी घडली की,माझे वडील रखमाजी भाऊसाहेब राऊत पाटील यांचे ड्यूटीवर असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.तो दिवस होता २० आँक्टोबर १९७३ या दिवशी आमच्या सुखी संसाराची राखरांगोळी झाली.व माझ्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला.आणि आईला पुन्हा कौळाणेचा माहेरचा रस्ता धरावा लागला.त्यावेळी मी तर अवघा दिड दोन वर्षांचा होतो.कौळाणे गावी आल्यावर माझ्या आईला अतोनात संघर्षाचा सामना करावा लागला.नातेवाईक तर साले भामटे कुणीही आईच्या मदतीला उभे राहिले नाहीत.आईने अनेक रात्री मला कुशीत घेऊन झोपताना रडून काढल्याचे मला अजूनही चांगलेच आठवते.मी खुप शिक्षण घ्यावे व नाव कमवावे हे माझ्या आईचे स्वप्न.! त्यासाठी तीने अपार कष्ट केलेत.अखेरच्या श्वासापर्यंत तिचा संघर्ष मला घडविण्यासाठी सुरुच होता.मला जेव्हा थोडे फार कळायला लागले तेव्हा मी माझे जीवन पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवेसाठी उपयोगी आणण्याचा निर्धार केला आणि त्यानुसार पुढे हेच क्षेत्र निवडले.माझ्या अत्यंत वाईट काळात व दुःखाच्या प्रसंगात मला अगदी भरभरून साथ दिली ती व-हाणेतील माझ्या आईच्या मेव्हणभाऊ असलेल्या दादाजी रतन शेवाळे या व्यक्तीने व त्याची मुलगी आशाबाई तथा अक्का हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत.मला कधीच परकेपणाची जाणीव होऊ दिली नाही.त्यामुळेच मी आज ठामपणे व निर्भिडपणे उभा आहे.आई गेल्यावर अनेक संकटे आलीत. दुःखाना सामोरे गेलो.पण…हिमंत कधीच हरलो नाही.आईची शिकवण जिद्द, हिंमत आत्मविश्वास असल्यावर काहीच कमी पडत नाही हे शब्द नेहमीच स्मरण म्हणून आजही कानात गुंजतात.त्याशिवाय आशाबाई अक्का हिचे नेहमीच लाभणारे मार्गदर्शन व खंबीरपणे पाठीशी उभी राहून देत असलेली साथ या जीवन जगण्याला बहुमोल आधार देऊन जाते…हेच माझे परमभाग्य आहे.
आज जागतिक मातृदिन त्यानिमित्त माझे जीवन घडविण्यासाठी अहोरात्र संघर्ष करणाऱ्या माझ्या आईच्या पावन स्मृतीस शत शत नमन व विनम्र अभिवादन!

राजेंद्र पाटील राऊत संस्थापक अध्यक्ष युवा मराठा महासंघ महाराष्ट्र,संस्थापक अध्यक्ष आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे , मुख्य संपादक युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनल महाराष्ट्र

Previous article..अखेर शेतकऱ्यांच्या “त्या” पत्रकार परिषदेची घेतली आमदार नाना पटोले यांनी दखल
Next articleजगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार (मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस)
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here