आशाताई बच्छाव
मुंडीपार येथील भेल प्रकल्प तात्काळ सुरू करा याकरिता भंडारा-गोंदिया लोकसभेचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचे धरणे आंदोलन
संजीव भांबोरे
भंडारा- साकोली तालुक्यातील मुंडीपार सडक येथे भेल प्रकल्प गेल्या 13 वर्षापासून प्रलंबित असून पाचशे एकर जमीन शेतकऱ्यांची त्या ठिकाणी गेलेली आहे .एक तर भेल प्रकल्प होत नाही व दुसऱ्या बाजूला त्याऐवजी दुसरा प्रकल्प सुद्धा होत नाही व तिसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे जमीन सुद्धा वापस देत नाही त्यामुळे शेतकरी फार मोठ्या प्रमाणात चिंता तुर झालेले आहेत. बेरोजगारी वाढलेली आहे आणि बेरोजगारी भंडारा जिल्ह्यातील दूर व्हावी यासाठी अतिशय महत्त्वकांक्षी भेल प्रकल्प व्हावा या बाजूने सर्व जनता व बेरोजगार आहेत. खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव डी जी रंगारी व ईतर कार्यकर्तेही यांनी सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे आंदोलनाला पाठिंबाचे पत्र खासदार प्रशांत पडोळे यांना दिलेला आहे .तसेच विविध सामाजिक संघटना, सरपंच संघटना यांनी सुद्धा पाठिंबा दिलेले आहे. तसेच याप्रसंगी सर्व इथे हे प्रकल्पाचे अधिकारी ,एमआयडीसीचे अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते .एक महिन्याच्या कालावधी त्यांना देण्यात आलेला आहे. जर एक महिन्यात कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार डॉ प्रशांत पडोळे व भेल ग्रस्त शेतकरी यानी दिलेला आहे. त्या पद्धतीचे निवेदन त्यांनी तहसीलदार आणि भेल प्रकल्पाचे अधिकारी यांना देण्यात आले आहे. या प्रसंगी भेल संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय नवघरे ,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी, मुंडीपार सरपंच मनोरमा हमने, ब्राह्मणीचे सरपंच मुकेश मेनपाले, सामाजिक कार्यकर्ते चूनीलाल वासनिक,चंदू चौधरी , राजेश भदाडे गोपीचंद, नावखरे, गिरीश रहांगडाले, मेदन लांडगे, विजय दुबे, डी जी रंगारी, किशोर शेंडे परमानंद मेनपाले, राकेश मस्के, बाबिता जंनबंधू, नाना भदाळे व ईतर मुंड पर ,ब्राह्मणी खैरी शेतकरी मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता
त्याचप्रमाणे तहसील ऑफिस व पोलीस विभागाचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.