आशाताई बच्छाव
मंत्री नितेश राणे व इंद्रनील नाईक यांनी केले जगताप कुटुंबियांचे सांत्वन अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे
अहिल्यानगरचे दिवंगत माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या कुटुंबियांची राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, उद्योग व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार संतोष दानवे, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, राज्य साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी भेट घेतली.
यावेळी स्व.अरुण जगताप यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. आमदार संग्राम जगताप व सचिन जगताप यांची भेट घेऊन संवेदना व्यक्त केल्या.
यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले, सर्व सामान्य जनतेसाठी आयुष्यभर काम केलेले लोकनेते अरुणकाका जगताप यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. हिंदुत्ववादी लढ्यातील मला साथ देणारे माझे मित्र आमदार संग्राम जगताप व त्यांच्या कुटुंबियांना या धक्क्यातून सावरण्याची ताकद परमेश्वराने द्यावी, अशी प्रार्थना करून सांत्वन केले.