Home भंडारा साकोली येथे संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम १२ मे रोजी बुद्ध पौर्णिमेचे औचित्य -भीम...

साकोली येथे संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम १२ मे रोजी बुद्ध पौर्णिमेचे औचित्य -भीम सेनेचा उपक्रम

139

आशाताई बच्छाव

1001481792.jpg

साकोली येथे संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम १२ मे रोजी

बुद्ध पौर्णिमेचे औचित्य -भीम सेनेचा उपक्रम

संजीव भांबोरे
भंडारा –साकोली येथेबुध्द पौर्णिमेच्या मंगल पर्वावर स्वातंत्र, समता, न्याय आणि करूणा प्रदान करणाऱ्या बुध्द धम्माचा आणि आंबेडकरी विचारांचा प्रसार प्रचार व्हावा असा मनाशी उद्देश बाळगुण स्वाभिमानी सामाजिक संघटना भीम सेनेच्या वतीने दि.१२ मे २०२५ रोजी सायं.६ वाजता होमगार्ड परेड ग्राऊंड साकोली येथे भीमक्रांतीचा बुलंद आवाज राष्ट्रीय प्रबोधनकार संविधान मनोहरे, अमरावती यांच्या संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे (कव्वाली) आयोजन करण्यात आले आहे.

उद्‌घाटक म्हणून आ. नाना पटोले तर अध्यक्षस्थानी

खा. प्रशांत पडोळे असतील. अतिथी म्हणून इंजि. नरेश गणविर, राहुल (छोटु) राऊत, ओम गायकवाड, सचिन गजभिये, सुमित शहारे, समाजकल्याण सभापती शितल राऊत, होमराज कापगते, अश्विन नशिने, ग्यानिराम गोबाडे,अमोल हलमारे, गिरीश रहांगडाले, विजू दुबे, संदिप बावनकुळे, राजेश सुर्यवंशी, दिपक वानखेडे, प्रविण भांडारकर,पी. एम. कोटांगले,उमेश कठाने, रवि परशुरामकर, अशोक कापगते, आशिष मारवाडे, रूपचंद टेंभुर्णे, नंदू गेडाम, गोलू धुर्वे, रिषभ तांडे, पंकज वासनिक आदी मान्यवर उपस्थित राहतील.

कार्यक्रमासाठी छत्रपती गृप, साकोली, सक्षम फाउंडेशन, साकोली व हजरत बाबा भाई साहब उर्स कमेटी, साकोली यांचा सहयोग असून जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Previous articleसोसाट्याचा वारा सुटला ! एसपी ऑफिसचा खांब फुटला…
Next articleराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे शिबीर सुरू.आश्रमात१२0, विद्यार्थी२0, दिवस घेणार संत विचाराचे धडे ,
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.