Home जालना राष्ट्रीय सेवेत चिकित्सकांचे अमूल्य योगदान – डॉ. सत्यप्रकाश चौहान

राष्ट्रीय सेवेत चिकित्सकांचे अमूल्य योगदान – डॉ. सत्यप्रकाश चौहान

104

आशाताई बच्छाव

1001477517.jpg

राष्ट्रीय सेवेत चिकित्सकांचे अमूल्य योगदान
– डॉ. सत्यप्रकाश चौहान
देशभरातील यशस्वी चिकित्सकांचा गौरव समारंभ
बदनापूर,/जालना दि. ४ (प्रतिनिधी दिलीप बोंडे)-राष्ट्राच्या उभारणीत वैद्यकीय क्षेत्राचाही
मोठा सहभाग असून राष्ट्रीय उन्नतीसाठी डॉक्टरांचे (चिकित्सक) मोठे योगदान
असल्याचे प्रतिपादन विश्व आयुर्वेद परिषद व भारत आरोग्य संघटना यांनी
आयोजित केलेल्या मानसिक ताण-तनाव नियंत्रणविषयक राष्ट्रीय सेमिनार येथे
केले. या वेळी भारतभरातील विविध भागातील नामवंत व यशस्वी  डॉक्टर्सचा
सत्कार कार्यक्रम ही आयोजित करण्यात आला होता. यात जालना जिल्ह्यातील
डॉक्टरांचाही मोठा सहभाग होता.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मानसिक ताण-तणाव विषयक अभ्यासक
प्रा.अरूण कुमार पाणीग्राही (प्राचार्य, आर. जी. एस. मेडीकल
महाविद्यालय,लखनौ),प्रा.आरती सिंह (एस.के.डी. फार्मसी महाविद्यालय) हे
होते तर अध्यक्षस्थान डॉ.संजय रस्तोगी (मेडीकल डायरेक्टर, सुर्यसिटी
हॉस्पिटल लखनौ) यांनी भूषविले होते. या वेळी पुढे बोलताना डॉ. सत्यप्रकाश
चौहान यांनी डॉक्टर्स करत असलेल्या राष्ट्रसेवेचा उल्लेख करून सध्याच्या
जीवन पध्दतीत मानसिक ताण-तणाव दूर करण्यासाठी विविध उपायायोजना कथन
केल्या. या वेळी देशभरातील विविध भागातील यशस्वी व नामवंत डॉक्टर
(चिकित्सक) यांचा गौरव करण्यात आला.
झंडू, मॅक्लॉईड, नेप्रâोग्रिट आणि जीएलएचसी फार्मा या कंपनीने सहभाग घेऊन
या कार्यक्रमात मानसिक ताण- तणाव प्रणालीबाबत विविध उपाययोजना करण्यासाठी
सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याच कार्यक्रमात डॉ.सत्यप्रकाश चौहान,
डॉ. गौरव शर्मा, डॉ.वैशाली गुप्ता, डॉ. संदीप मिश्रा, डॉ. रवी शुक्ला,
डॉ. धमेंद्र सिंह,डॉ.स्वप्नील यांना वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात केलेल्या
उल्लेखनिय कार्याबद़दल सन्मानचिन्ह देऊन गौरवित करण्यात आले.