Home उतर महाराष्ट्र जिल्ह्यात अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे; २३ गुन्हे दाखल

जिल्ह्यात अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे; २३ गुन्हे दाखल

116

आशाताई बच्छाव

1001477654.jpg

जिल्ह्यात अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे; २३ गुन्हे दाखल                                                      अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे 
जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून १ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत विविध पोलीस ठाण्यात २३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने नगर तालुका, श्रीरामपूर शहर, नेवासा, श्रीगोंदा व राहुरी पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने नगर तालुक्यात तीन ठिकाणी छापे टाकून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत ११ ठिकाणी छापा टाकले.
नेवासा पोलीस ठाणे हद्दीत ५, श्रीगोंदा तीन, तर राहुरी पोलीस ठाणे हद्दीत जुगार आड्यावर छापा टाकून १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleराष्ट्रीय सेवेत चिकित्सकांचे अमूल्य योगदान – डॉ. सत्यप्रकाश चौहान
Next articleलोखंडी कोयता बाळगणाऱ्या एकावर चाळीसगाव पोलिसांची कारवाई
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.