आशाताई बच्छाव
भोकरदन शहरात गारा व मेघ गरजने सह पाऊस बच्चे कंपनीने घेतला पावसात भिजत गारांचा आनंद
भोकरदन प्रतिनिधी गजेंद्र पाटील लोखंडे
भोकरदन शहरामध्ये गारा मेघगर्दने सह अवकाळी पाऊस पडला असून सर्वत्र गारा दिसत होत्या बच्चे कंपनीने आपल्या अंगणामध्ये पडत असलेल्या गारा वेचल्या व पडत असलेल्या पावसात ओले चिंब होऊन उड्या मारत आनंद लुटला बऱ्याच दिवसापासून तापमानात वाढ झाल्यामुळे उष्णता निर्माण झाली होती घरामध्ये रात्रंदिवस कुलरच्या हवेत बसावे लागत होते परंतु आज पडलेल्या पावसामुळे थोडाफार का होईना गारवा निर्माण होऊन तापमानापासून थोड्याफार प्रमाणात सुटका मिळाली बच्चे कंपनीने अंगणामध्ये उड्या मारत एकमेकांनी गारा झेलत आनंद लुटला पावसाला जून महिन्यामध्ये सुरुवात होते परंतु आज पडलेल्या या पावसामुळे असं वाटत होतं की पावसाळा सुरू झाला की असे वातावरण निर्मिती होऊन पाऊस पडत होता वेधशाळेच्या हवामानाच्या अंदाजानुसार दोन-तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता तो आज खरा ठरला .