Home जालना डॉ.सुरेखा लहाने यांची शैक्षणिक कामाकरता राष्ट्रमाता जिजाऊ राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कारासाठी निवड

डॉ.सुरेखा लहाने यांची शैक्षणिक कामाकरता राष्ट्रमाता जिजाऊ राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कारासाठी निवड

180

आशाताई बच्छाव

1001472677.jpg

डॉ.सुरेखा लहाने यांची शैक्षणिक कामाकरता राष्ट्रमाता जिजाऊ राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कारासाठी निवड

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

सविस्तर वृत्त असे की डॉ सुरेखा संजयजी लहाने यांनी आजवर शिवव्याख्यानाच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल यंदाचा राष्ट्रमाता जिजाऊ राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे योजिले आहे. सदर पुरस्काराचे वितरण ९ मे २०२५ रोजी उद्धघाटन सोहळ्यात होणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने ३१ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन ९ व १० मे २०२५ रोजी वसंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजीत केले आहे. लोकनेते मा. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घघाटन होणार आहे. साहित्यिक व विचारवंत या संमेलनास उपस्थीत राहणार आहेत. पुरस्कार स्वीकारण्यासाठी डॉ. सुरेखा संजयजी लहाने यांनी उपस्थीत रहावे असे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने एका पत्रकाद्वारे कळविले आहे.