Home बुलढाणा सब कुछ मॅनेज है?’ – क्रेनद्वारे लाखो ब्रास वाळूचा उपसा ! –...

सब कुछ मॅनेज है?’ – क्रेनद्वारे लाखो ब्रास वाळूचा उपसा ! – भास्तन व कठोरा येथील पूर्णा नदीला पोखरले ! – कलेक्टर साहेब लक्ष द्या हो!

101

आशाताई बच्छाव

1001468144.jpg

‘सब कुछ मॅनेज है?’ – क्रेनद्वारे लाखो ब्रास वाळूचा उपसा ! – भास्तन व कठोरा येथील पूर्णा नदीला पोखरले ! – कलेक्टर साहेब लक्ष द्या हो!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- शेगाव तालुक्यातील भास्तन व कठोरा येथील पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात क्रेन द्वारे वाळूची तस्करी होत असून, महसूल यंत्रणेने वाळू तस्कर ‘पुष्पां’ पुढे गुडघे टेकल्याचे चित्र आहे. दरम्यान कलेक्टर साहेबांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
शेगाव तालुक्यातील भास्तन व कठोरा येथील पूर्णा नदी पात्रातून भोटा, कठोरा, सगोडा या घाटाचा लिलाव झाला नसतांना परीसरातील वाळू तस्कर क्रेन द्वारे लाखो ब्रास वाळूचा उपसा
करून शासनाला कोट्यावधींचा चूना लावत आहे. अवैध वाळू उपसा व वाहतूक जोमात सुरू असून, महसूल यंत्रणा मात्र कोमात गेल्याचे दिसून येते. वाळू तस्करीला नियंत्रणात आणण्यासाठी महसूल विभागाने बैठे पथक तैनात केले तरी ‘सब कुछ मॅनेज है!’ ची भाषा वाळू तस्करांकडून वापरली जाते. प्रशासकीय यंत्रणा ढिम्म असल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी याकडे लक्ष द्यावे व अवैध वाळू उपसा थांबवून तस्कराच्या मुसक्या आवळाव्या, अशी मागणी केली जात आहे.

Previous articleशेतात काम करताना विजेचा शॉक लागून राजेंद्र राऊत यांचा मृत्यू; खामगाव तालुक्यातील घटना..
Next articleवक्फ सुधारणा कायदा रद्द करा!’ मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.