Home बुलढाणा शेतात काम करताना विजेचा शॉक लागून राजेंद्र राऊत यांचा मृत्यू; खामगाव तालुक्यातील...

शेतात काम करताना विजेचा शॉक लागून राजेंद्र राऊत यांचा मृत्यू; खामगाव तालुक्यातील घटना..

97

आशाताई बच्छाव

1001467925.jpg

शेतात काम करताना विजेचा शॉक लागून राजेंद्र राऊत यांचा मृत्यू; खामगाव तालुक्यातील घटना..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-खामगाव शेतात शेत काम करत असताना विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील उमरा – अटाळी गावात घडली आहे. राजेंद्र महादेव राऊत (५५) रा.उमरा -अटाळी असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. राऊत हे २ मे रोजी सकाळी आपल्या स्वतःच्या शेतात काम करण्यासाठी गेले होते, यावेळी शेतातील विहिरीजवळ गवत कापत असताना मोटरीच्या वायरचा त्यांना शॉक लागला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. राऊत यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे.