आशाताई बच्छाव
स्वामी समर्थ केंद्र भोकरदन या ठिकाणी गुरुचरित्र पारायण मध्ये युवा मराठा न्यूज नेटवर्क चे प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे यांना कसा आला पठानासाठी योग स्वतः सांगितलं अनुभव
भोकरदन येथे श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये दरवर्षीप्रमाणे गुरुचरित्र महापराण्याची वाचन केले जाते या ठिकाणी रविवारपासून या गुरुचरित्र महा पारायण सोहळ्याला प्रारंभ झाला होता त्याची आज सांगता झाली. या पारायण सोहळ्यासाठी पारायण वाचना वाचनासाठी आपल्याला सुद्धा मिळावे असे प्रत्येक जणाला वाटते परंतु भाविक भक्त जास्त प्रमाणात या ठिकाणी येतात व दहा ते पंधरा दिवसा अगोदर या ठिकाणी नाव नोंदणी केल्या जाते केंद्रामध्ये जेवढी जागा बसण्यासाठी आहे केवढ्यांनाच या ठिकाणी संधी मिळते त्याच लोकांना या ठिकाणी पारायणाला बसण्याचा योग येतो मी स्वतः या ठिकाणी माझ्या आप्तिष्ठांचे व माझ्या अर्धांगिनीची नाव नोंदणी केली होती माझ्या सुद्धा मनात इच्छा होती आपण सुद्धा या पारायणाला बसावं परंतु मुले लहान असल्याकारणाने माझे नाव नोंदविता आली नाही माझी पत्नी अर्धांगिनी पारायण सोहळ्याला बसली होती त्यामुळे मला मुलांचा सांभाळ करा लागत होता म्हणतात ना नशिबात असेल तर केव्हा पण मिळते असाच योग आला आणि मला दहा ते बारा अध्याय वाचनाच करायला मिळालेआणि माझ्या मनात असलेली भावना व इच्छा या ठिकाणी माऊलीने पूर्ण केली मनातील इच्छा साध्य करायचे असेल तर भगवंतावर श्री गुरुमाऊली श्री स्वामी समर्थावर श्रद्धा असायला हवी मी त्यांना सांगू इच्छितो मनात श्रद्धा असेल तर देव तुम्हाला कुठे भेटतो तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतो हा माझा अनुभव आहे या अगोदर सुद्धा मला माऊलीच्या कृपेने अनुभव आलेले आहे श्री स्वामी समर्थ






