Home जालना वैद्यकीय महाविद्यालयात क्राईम संदर्भात व्याख्यान जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख

वैद्यकीय महाविद्यालयात क्राईम संदर्भात व्याख्यान जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख

218

आशाताई बच्छाव

1001446100.jpg

वैद्यकीय महाविद्यालयात क्राईम संदर्भात व्याख्यान
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 27/ 04/2025
याविषयी सविस्तर माहिती अशी की, जालना येथील वैद्यकीय महाविद्यालयात शैक्षणिक जागृती व गुन्हेगारी या विषयावर मा.पद्माकरराव देशमुख सेवानिवृत्त ए.एस.आय. पोलीस विभाग जालना यांच व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं.यावेळी देशमुख यांनी अनेक गुन्ह्याविषयी वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यासोबतच विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर भर देऊन आपले व आई -वडीलांचे स्वप्न साकार करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहुन समाजात एक आदर्श निर्माण करावा.यासोबतच गुन्हेगारी पासुन अलीप्त राहाण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं. वाईट व्यसन व वाईट विचार यापासून आपण विद्यार्थ्यांनी दूर राहावं चिकाटीने अभ्यास करून आपलं उद्दिष्ट साध्य करण्याची गरज असल्याची प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालय जालना येथील सर्व कर्मचारी स्टाफ हजर होता.