आशाताई बच्छाव
उदगीर नगर परिषद व पोलीस खात्याच्या अकार्यक्षमतेमुळे, पत्तेवार चौकातील रस्ता चोरीला ?
बी.जी.शिंदे, लातूर जिल्हा प्रतिनिधी
उदगीर शहर हे जिल्हा होण्याच्या मार्गावरील शहर असून, लातूर जिल्ह्यातील दुय्यम दर्जाचा तालुका म्हणून ओळखला जातो. परंतु या शहरातील नगर परिषदेच्या अंतर्गत रस्त्याची वाईट परिस्थिती झाली असून, या रस्त्यामुळे रहदारीला फार मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. आज चित्र पाहिल्यास उदगीर जिल्हा होण्याच्या मार्गापासून वंचित झाला असून,अनेक किलोमीटर लांब गेलेला आहे. उदगीर शहरातील पत्तेवार चौक हा फार मोठा असून, या चौकातून चारही बाजूस रस्ते जातात. या भागातील कापड लाईन ही प्रसिद्ध आहे. येथे दररोज वरदळ चालू असते. कापड खरेदीसाठी महिला व पुरुषांची दररोजची तोबा गर्दी राहत असते. याच पत्तेवार चौकाच्या भागातील चारही बाजूचे रस्ते आज चोरीला गेलेले असून, भाजी विक्रेतेच्या ताब्यात आहेत. या चारही बाजूस भाजी विक्रेत्यांनी भाजीचे गाडे लावून, रोडवर कब्जा केलेला आहे. या बाबतीत जनतेने विचारणा केल्यास उद्धट वागणूक भाजी विक्रेत्या कडून दिली जाते. किंवा जातीयवादाचा रंग दिला जातो. यातून मोठ्या प्रमाणात हिंदू-मुस्लिम दंगल उसळल्याचे प्रकरणही यापूर्वी घडलेले आहे. हे उल्लेखनीय व विशेष आहे. याचाच फायदा हे फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, विनापरवाना, विनापरवानगी तीक्ष्ण हत्याराने दिवसाढवळ्या मटन दुकान, चिकन दुकान, शाॅप मालक दंडलशाहीने तसेच उद्धट वर्तन सह अश्लील भाषा, अरेरावी, गुंडगिरीची भाषा, नंग्या तीक्ष्ण हत्यार दिवसाढवळ्या मटन दुकान, चिकन दुकान या शॉपीतून लखलखत्या उन्हामध्ये चकचकत दाखवितात. आज या भागात जनतेला चालणे अवघड होऊन बसलेले आहे. पोलीस खाते व नगरपरिषद यांना हे सर्व माहीत असून देखील, मुग गिळून गप्प बसलेले चित्र पाहावयास मिळत आहे. या भागात सीसीटीव्ही कॅमेरे असून नसल्यासारखे झालेले आहेत. या बाबतीत यापूर्वी लातूरचे पोलीस अधीक्षक साहेब, यांनी बरेच वेळा बैठका घेऊन देखील, या बैठका अकार्यक्षम झालेले आहेत. या भागात सुधारणा व्हावी म्हणून पोलीस चौकी बसवण्यात आली. परंतु या पोलीस चौकीत एकही कॉन्स्टेबल दिसून येत नाही. उलट भाजी विक्रेत्यांनी या पोलीस चौकीमध्ये आपले भाजीचे व्यापार उभारलेले दिसून येत आहे. या भागातील चारही रस्ते अतिक्रमणाच्या ताब्यात गेलेले दिसून येत आहे. पोलीस खाते व नगरपरिषद यांचे कुठे पाणी मरत आहे, हे दिसणे अवघड झालेले असून, जनतेत चर्चेचा विषय बनलेला आहे. गाडी पार्किंगला देखील रस्ता मिळत नाही. प्रत्येक दुकानासमोर भाजीवाल्याने अतिक्रमण केल्यामुळे, चोरून याचे भाडे दुकानदार घेतात का नगरपरिषद घेते हे जाणून घेणे अवघड झालेले चित्र पहावयास मिळत आहे. उदगीर जळकोटचे कर्तव्यदक्ष आ. संजय बनसोडे यांच्या कानावर ही बाब बरेच वेळा घालण्यात आली. परंतु जाणीवपूर्वक त्यांचे पण याकडे दुर्लक्ष होत आहे. या भाजी विक्रीतेच्या अतिक्रमणास पोलीस खाते, नगरपरिषद, संबंधित आमदार हेच जबाबदार आहेत. जर वेळीच हे अतिक्रमण नाही हटवल्यास उदगीरची जनता ही आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे चित्र स्पष्ट झालेले आहे. याकडे पोलीस खाते, नगरपरिषद, संबंधित आमदार हे काय लक्ष देतील, याकडे उदगीरच्या जनतेचे लक्ष लागून आहे.
या अतिक्रमणाचे खास वैशिष्ट्ये.
चौकट :- पत्तेवार चौकातील चारही बाजूचे रस्ते हे भाजी विक्रेत्याच्या ताब्यात गेल्यामुळे, रहदारीला फार मोठा अडथळा, या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे असून नसल्यासारखे दिसून येत आहे. या भागातील पोलीस चौकीवर भाजी विक्रेत्यांचा ताबा दिसून येत आहे. कापड विक्रेत्यांच्या धंद्यावर फार मोठा परिणाम होत असल्याचे चित्र स्पष्ट झालेले आहे. भाजी विक्रेत्यांचा ताबा झाल्यामुळे, गाडी पार्किंगसाठी फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे. पोलीस खाते व नगरपरिषद यांच्या अकार्यक्षमतेमुळे, जनतेत नाराजी, या भागात महिलांना व शालेय विद्यार्थ्यांना फिरणे अवघड झालेले आहे. जर या भागातील अतिक्रमण नाही काढल्यास जनता आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. या भागातील भाजी विक्रेत्यांची दादागिरी वाढत असून, गुन्हेगारीला खत पाणी दिल्यासारखे दिसून येत आहे. अशी चर्चा प्रत्येक भाजी मार्केटमध्ये येणाऱ्याची होत आहे हा प्रश्न सोडवतील का असाही प्रश्न जनतेतून विचारला जातो आहे.






