Home जालना आशाताई पांडे यांच्या प्रयत्नांना यश सिल्लोड आव्हाना वाकडी कुकडी मार्गे पिंपळगाव बस...

आशाताई पांडे यांच्या प्रयत्नांना यश सिल्लोड आव्हाना वाकडी कुकडी मार्गे पिंपळगाव बस सेवा सुरू

200

आशाताई बच्छाव

1001441857.jpg

आशाताई पांडे यांच्या प्रयत्नांना यश सिल्लोड आव्हाना वाकडी कुकडी मार्गे पिंपळगाव बस सेवा सुरू
भोकरदन तालुका प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे
भारतीय जनता पार्टीच्या महिला माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई पांडे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून सिल्लोड व्हाय आव्हाना मार्गे बस सेवा सुरू करण्यात यावी यासाठी कार्यकर्त्याच्या वतीने आशाताई पांडे यांना विनंती करण्यात आली होती सिल्लोड वरून आव्हाना वाकडी कोकडी जळगाव सपकाळ एपिसोडे मार्गे पिंपळगाव रेणुकाई बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती आशाताई पांडे यांनी सदरील कार्यकर्त्याच्या मागणीचा विचार करून एसटी महामंडळाचे मुख्य अधिकारी यांच्याशी संपर्क करून व पत्राद्वारे बस सेवा सुरू करण्याची विनंती केली होती त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून आज दिनांक 25 रोजी बस सेवाला प्रारंभ झालेला आहे आज सकाळी सिल्लोड इथून बस आव्हाना या ठिकाणी आल्यानंतर आव्हाना गावी बसचे स्वागत करताना आशाताई पांडे ईश्वर रामलाल पांढरे धनगर समाज संघर्ष विभागीय अध्यक्ष व बागवान प्रमोद गावंडे भानुदास सरोदे इतर हजारो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते यांनी आव्हाना या गावात बस चे आगमन होतास आशाताई पांडे यांच्या हस्ते बसला हार अर्पण करून स्वागत केले व तसेच महिलांच्या वतीने आशाताई पांडे यांचे स्वागत करण्यात आले सत्कार वेळी बोलताना गावातील इतर समस्या बाबत चर्चा करण्यात आली व त्या समस्याचे निराकरण लवकरच करण्यात येईल व सोडवण्यात येईल अशी आश्वासन अशा ताई पांडे यांनी दिले ही बस सेवा सुरू करण्यासाठी भोकरदन जाफराबाद विधानसभेचे आमदार संतोष भाऊ दानवे यांच्याकडे व आशाताई पांडे यांच्याकडे धनगर संघर्ष समाज संघटनेचे विभागीय अध्यक्ष ईश्वर रामलाल पांढरे यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले असून यामध्ये त्यांचासुद्धा खारीचा वाटा असल्याची नागरिकाच्या वतीने बोलले जात आहे यावेळी गाडीचे पूजन करून पुढील गावासाठी बस मार्गस्थ करण्यात आली व गावकऱ्यांच्या वतीने आशाताई पांडे यांचे धन्यवाद व आभार व्यक्त करण्यात आले

Previous articleबांबूच्या वस्तूने मेळघाटात तीन गावांना ओळख: बिहारी ज्ञानपीठ बोरी बांबू केंद्र परिसरातील२00, घरांची उपजीविका बांबू वस्तूवरच.
Next articleवालसावंगी येथील नितीन अंबादास बोडखे यांची आयपीएस पदी निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.