Home उतर महाराष्ट्र पहलगाम घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरेंच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन

पहलगाम घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरेंच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन

84
0

आशाताई बच्छाव

1001441819.jpg

श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी –जम्मू-कश्मीरमधील पहलगामच्या बैसरण व्हॅलीमध्ये निष्पाप पर्यटकांवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनील तटकरे यांच्यासह पक्षाच्या मंत्री महोदय आणि आमदारांनी दंडाला काळया फिती बांधून मंत्रालयाशेजारील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ या घटनेचा निषेध नोंदविला आणि शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि एकतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच एकजुटीने उभा राहील.

यावेळी मा. ना. श्री. हसन मुश्रीफ, मा. ना. श्री. नरहरी झिरवाळ, मा. ना. श्री.मकरंद पाटील, विधानसभा उपाध्यक्ष मा. श्री. अण्णा बनसोडे, मा. ना. कु. आदिती तटकरे, मा. ना. श्री. इंद्रनील नाईक, प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष मा. आ. श्री. शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्ष मा. सौ. रुपालीताई चाकणकर, मा. आ. श्री. इद्रिस नायकवाडी, मा. आ. श्री. पंकज भुजबळ, मा. आ. श्री. अनिल पाटील, मा. आ. श्री. सुनील शेळके, माजी आमदार मा. श्री. लहू कानडे, मुख्य प्रवक्ते मा. श्री. आनंद परांजपे, प्रवक्ते मा. श्री. संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सूरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस मा. सौ. राजलक्ष्मी भोसले, प्रदेश सरचिटणीस मा. श्री. लतिफ तांबोळी, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष मा. श्री. प्रशांत कदम, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष मा. श्री. महेंद्र पानसरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here