Home जालना मा.केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे  यांचा ड्रीम प्रोजेक्ट अंतिम टप्प्यात

मा.केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे  यांचा ड्रीम प्रोजेक्ट अंतिम टप्प्यात

55

आशाताई बच्छाव

1001441027.jpg

मा.केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे  यांचा ड्रीम प्रोजेक्ट अंतिम टप्प्यात….

जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ –मराठवाडा आणि लगतच्या विदर्भातील उद्योग, व्यापार व शेतकऱ्यांना देशांतर्गत तसेच परदेशांत मालाची सहजपणे अतिशय स्वस्त दरांत वाहतूक व्यवस्था असलेल्या ड्रायपोर्ट मल्टीमोड लाॅजिस्टीक पार्क चे प्रत्यक्ष कामकाजाची माहिती आणि ड्रायपोर्ट परिसराला  जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी व शेतकऱ्यांनी बुधवारी दि.२३ रोजी भेट देऊन पाहणी केली.

रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या सभागृहात आयोजित बैठकीत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते भास्कर पाटील दानवे यांनी मराठवाड्यातील सर्व उद्योजक, व्यापारी आणि शेतकरी ड्रायपोर्टचे प्रत्यक्ष कामकाज लवकरात लवकर सुरू होण्याची प्रतिक्षेत आहेत असे सांगून तो सुवर्ण क्षण उगवला आहे असे म्हटले हा प्रकल्प संपूर्ण मराठवाड्याचे चित्र बदलण्याची क्षमता असलेला आहे असे दानवेंनी सांगितले माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या ड्रायपोर्टच्या उभारण्यात खूप प्रचंड मेहनत घेतली असून खर्या अर्थाने आता विकासाला गती मिळाली आहे असे ते म्हणाले.

यावेळी जेष्ठ उद्योजक सुनील रायठठ्ठा, पोलाद स्टील चे संचालक नितीन काबरा, महीको चे संचालक रितेश मिश्रा, आयकॉन स्टील चे संचालक उषमेश राठी व अखिलेश राठी, कालिका स्टील चे संचालक गोविंद गोयल व गोपाल गोयल, लघुउद्योग भारती संघटनेचे अविनाश देशपांडे, नितीन बागडी, भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष सतीश जाधव, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा संघठन मंत्री सिध्दीविनायक मुळे  जिल्हा उपाध्यक्ष श्री.धनराज काबलीये मंडळ अध्यक्ष श्री.महेश निकम श्री.निवृत्ती लंके उपस्थित होते.

 

Previous articleपानेवाडीत रंगला कुस्तीचा महासंग्राम! विजेत्यांना घाटगे पाटलांच्या मानाची बक्षिसे 
Next articleअनसिंग येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.