Home जालना पाणी टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टँकर सुरू करा – जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

पाणी टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टँकर सुरू करा – जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

89

आशाताई बच्छाव

1001409465.jpg

पाणी टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टँकर सुरू करा
– जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
शिवसेना शिष्टमंडळाने घेतली जि.प.सिईओची भेट
जालना, दि. १२ (प्रतिनिधी दिलीप बोंडे)-  सध्या उन्हाळ्याचे दिवस असून दिवसेंदिवस
उन्हाची तीव्रता वाढत आहे. जिल्ह्यातील छोट्या मोठ्या प्रकल्पांनी तळ
गाठला आहे. त्यामुळे जिल्यातील अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण होत आहे.
अनेक तांडे, वस्त्या व गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी
लागत आहे. याठिकाणी तात्काळ टँकर सुरू करावेत. जेणेकरून सामान्य नागरिकास
त्याचा दिलासा मिळेल, असे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी मिनियार यांना दिलेल्या
निवेदनात म्हटले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या
शिष्टमंडळाने शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले व जिल्हाप्रमुख भास्करराव
अंबेकर यांच्या नेतृत्वात नुकतीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी जगदीश मिनियार यांची भेट घेतली. जालना जिल्हा परिषदेत नव्यानेच
रुजू झालेले मुख्यकार्यकारी अधिकारी जगदीश मिनीयार यांचे शिवसेना (उद्धव
बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच जालना जिल्ह्यातील पाणी टंचाईसह इतरही समस्या मांडून जिल्ह्यातील
एकूण परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.यावेळी जिल्हा
संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवानराव कदम,मुरलीधर शेजुळ, बाबुराव
पवार, रमेश गव्हाड, मनीश श्रीवास्तव, मुरलीआबा थेटे, तालुका प्रमुख हरिहर
शिंदे, शहरप्रमुख बाला परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने बोलताना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
यांनी म्हटले की, अनेक गावांना जोडणारे ग्रामीण रस्ते मोठ्या प्रमाणावर
खराब झालेले आहेत.

Previous articleजागृत दक्षिणमुखी घनतुप्त हनुमान मंदिर बारागाड्या कार्यक्रम उत्साहात
Next articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि जिल्हा परिषद, लातूरच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.