Home जालना पारध बु येथे चैत्रद्वादशी देवीच्या स्वारीने बालाजी उत्सवाची सांगता.

पारध बु येथे चैत्रद्वादशी देवीच्या स्वारीने बालाजी उत्सवाची सांगता.

146

आशाताई बच्छाव

1001398687.jpg

पारध बु येथे चैत्रद्वादशी देवीच्या स्वारीने बालाजी उत्सवाची सांगता.
युवा मराठा न्यूज नेटवर्क भोकरदन तालुका रिपोर्टर गजेंद्र लोखंडे
भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथे पंधरा दिवसापासून सुरू असलेला बालाजी महोत्सव आज देवीच्या स्वारीने संपन्न झाला दरवर्षीप्रमाणे चैत्र एकादशीला महादेवाची सारी व द्वादशीला देवीची स्वारी निघते पारध नगरीमध्ये बालाजी उत्सवाच्या निमित्ताने एक आनंदाचे वातावरण निर्माण होते नोकरी निमित्ताने बाहेर गेलेले नागरिक या उत्सवाच्या निमित्ताने गावी येतात गावातील नागरिक व बाहेरगावाहून आलेले नागरिक भक्ती भावाने महादेवाचे व देवाच्या स्वारीची दर्शन घेऊन आपली मनोभावना या ठिकाणी बोलून दाखवता अनेक वर्षापासून चालत आलेली हा बालाजी उत्सवाची परंपरा आजही पारध बुद्रुक नगरीमध्ये कायम आहे दिवसेन दिवस तरुणांच्या उत्साहाने या बालाजी उत्सवाला अजूनच रंगत निर्माण झाल्याचे यावर्षी पाहायला मिळाले या उत्सवाच्या निमित्ताने लग्न झालेल्या मुली दिवाळीला न येता या उत्सवाला येत असतात असा हा उत्सव चैत्रद्वादशीच्या दिवशी देवीच्या स्वारीच्या उत्सवाने संपन्न होतो .

Previous articleसन 2024 मध्ये जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट यशस्वीरित्या सर करून तिथे राष्ट्रध्वज फडकावला
Next articleबातमीमागची बातमी… ठळक घडामोडी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.