Home जालना मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातील शिक्षकांची परीक्षा अखेर रद्द! मराठवाडा शिक्षक संघाच्या मागणीला...

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातील शिक्षकांची परीक्षा अखेर रद्द! मराठवाडा शिक्षक संघाच्या मागणीला यश.

133

आशाताई बच्छाव

1001398601.jpg

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळातील
शिक्षकांची परीक्षा अखेर रद्द!
मराठवाडा शिक्षक संघाच्या मागणीला यश.
——————————————–
परीक्षेस शिक्षकांचा होता विरोध; नियमबाह्य परीक्षा रद्द करण्याची मराठवाडा शिक्षक संघाने केली होती मागणी!
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 09//04/2025
याविषयी सविस्तर माहिती अशी की,
मराठवाड्यातील नामांकित शिक्षण संस्थेच्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने मंडळातील कार्यरत शिक्षकांची परीक्षा आयोजित केली होती. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता प्राप्त करून शिक्षक झालेल्या आणि गेली अनेक वर्षे यशस्वीपणे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा अवमान करणारी ही बाब होती. त्यामुळे मंडळातील शिक्षकांनी या परीक्षेस विरोध केला होता.विशेष म्हणजे या शिक्षकांवर हा मंडळाने दाखविलेला अविश्वास असून यामुळे मंडळातील एकूणच शिक्षकांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.मंडळाच्या या निर्णयाच्या विरोधात मराठवाडा शिक्षक संघाने शिक्षकांची नियमबाह्य परीक्षा रद्द करण्याची मागणी मा. शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांचेकडे केली होती. तसेच मंडळ कार्यालयासमोर आंदोलनाची हाक दिली होती. याचाच परिणाम म्हणुन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने शिक्षक परीक्षा रद्द केली असून तशा आशयाचे पत्र मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.
हा मराठवाडा शिक्षक संघाच्या संघशक्तीचा विजय असुन
मराठवाडा शिक्षक संघ यापुढेही शिक्षकांवर होणारा कोणताही अन्याय सहन करणार नाही. अन्यायाच्या विरोधात जशास तसे उत्तर देण्यास नेहमीच सज्ज असणार असल्याची प्रतिक्रिया मराठवाडा शिक्षक संघाने दिली आहे.

Previous articleजिल्हा परिषदच्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न म्हणजे सरकारचे नवे सोंग जुना देखावा! —- बोरशे गुरुजी
Next articleआठवणींचा डोह नव्हे सागरच….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.