आशाताई बच्छाव
भोकरदन जालना गजेंद्र लोखंडे तालुका प्रतिनिधी पारध बु येथील बालाजी उत्सवास प्रारंभ
भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथील बालाजी उत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून सकाळी नऊ वाजता महेश शेषराव देशमुख यांच्या इथून वाजत गाजत येऊन बालाजी संस्थान मंदिर या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडला जातो गावातील इतर नागरिक बालाजी उत्सव कमिटीचे पदाधिकारी दिलीप बेराड समाधान गुरुजी बंकिमचंद्र लोखंडे रमेश आंबेकर व आजी-माजी लोकप्रतिनिधी व इतर पंच कमिटीतील सदस्य या कार्यक्रमात हजर असतात झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडल्या नंतर पंच कमिटीच्या वतीने सायंकाळी गावांमधून निघणाऱ्या मिरवणुकीचे नियोजन करण्यात येते व सायंकाळी मिरवणुकीला सुरुवात होते मिरवणुकीमध्ये गावातील सर्व समाजातील नागरिक मोठ्या उत्साहाने भाग घेतात गावातील महिला भजनी मंडळ पुरुष भजनी मंडळ तसेच नवतरुण मंडळीच्या वतीने लेझीम खेळल्या जाते व मुगदल सुद्धा फिरवली जाते काठ्या फिरवल्या जातात तरुण मंडळी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात भाग घेतात रात्री नऊ ते दहा दरम्यान या मिरवणुकीची सांगता होती व चैत्र महिन्याच्या निमित्ताने गावामध्ये एकादशीला महादेवाची स्वारी निघते व दुसऱ्या दिवशी देवीची स्वारी निघते त्या स्वारीचे मानकरी यांना या पंच कमिटीच्या वतीने प्रसाद म्हणून श्रीफळ दिल्या जाते या उत्सवाच्या निमित्ताने बाहेरगावी नोकरी निमित्ताने किंवा व्यवसाय निमित्ताने गेलेले लोक आवर्जून या उत्सवासाठी पारध या नगरीत दाखल होतात दोन दिवस राहून सर्व उत्सव पार पडल्यानंतर परत आपल्या गावी परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात या उत्सवाला पोलीस बांधवांच्या वतीने सुद्धा चोक बंदोबस्त दिला जातो