
आशाताई बच्छाव
अहिल्यानगर (प्रतिनिधी): समाजाला योग्य मार्गाने नेण्याचे काम साहित्यिक करतात आणि या नवोदित साहित्यिकांना पाठबळ देण्याचे काम शब्दगंध करते. सोळा संमेलने यशस्वी करून शब्दगंधने आपल्या साहित्यिक कार्याचा ठसा अहिल्यानगर वासियांच्या मनामध्ये उमटवला आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, व्याख्याते प्रा.सिताराम काकडे यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य च्या वतीने आयोजित सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या आभार सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब भोसले हे होते तर विचारपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ. बाबा आरगडे, नेवासा तालुका अध्यक्ष प्रा. डॉ. किशोर धनवटे, कार्यवाह शाहीर भारत गाडेकर, दिगंबर गोंधळी, अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. किशोर धनवटे यावेळी बोलताना म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये गावागावात वाचन चळवळ वाढली पाहिजे, यासाठी शब्दगंध च्या वतीने नेवासा तालुक्यात आम्ही प्रयत्न करत आहोत, सर्वांचे पाठबळ मिळणे आवश्यक आहे. कॉ. बाबा आरगडे बोलताना म्हणाले की, बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये समाजाला प्रगत करणाऱ्या गोष्टींचा विचार करण्यात यावा, जुन्या अनिष्ट चालीरीती आणि प्रथा सोडून देऊन नव्याने चळवळी उभ्या करायला हव्यात.
अध्यक्षपदावरून बोलताना बापूसाहेब भोसले म्हणाले की, शेवगाव पासून सुरू झालेली ही साहित्यिक चळवळ आता खऱ्या अर्थाने राज्यस्तरावर पोहोचली असून अनेक नवोदित यामध्ये सहभागी होत आहे, 300 पेक्षा अधिक नवोदितांची पुस्तके प्रकाशित करून त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, ही अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे. साहित्य संमेलना नंतर लगेच हिशोब देऊन यशस्वी करणाऱ्यांचे आभार हे माणूसपणाच लक्षण आहे.
संस्थापक, सचिव सुनील गोसावी यांनी सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचा हिशोब सादर करून पुढील दिशा स्पष्ट केली. यावेळी दिगंबर गोंधळी, प्रा. डॉ.अनिल गर्जे, राजेंद्र फंड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य संघटक प्रा.डॉ. अशोक कानडे यांनी केले. तर शेवटी राज्य कार्यकारणी सदस्य सुभाष सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिला गोसावी व स्वाती ठुबे यांनी केले.
यावेळी कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, प्राचार्य अशोक दौंड, भगवान राऊत,बाळासाहेब कोठुळे, जयश्री झरेकर, प्रा. डॉ.तुकाराम गोंदकर बबनराव गिरी, प्रशांत सूर्यवंशी, सुरेखा घोलप, वर्षा भोईटे, स्वाती आहिरे, सरला सातपुते, सुजाता पुरी, शामा मंडलिक, शर्मिला रणधीर,जयश्री मंडलिक, आरती गिरी, शितल सावंत, बाळासाहेब शेंदुरकर, संतोष कानडे, पी एन डफळ, आत्माराम शेवाळे, पांडुरंग रोडगे, विठ्ठल सोनवणे, माधव सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऋषिकेश राऊत,निखिल गिरी, दिशा गोसावी, हर्षली गिरी, कल्याणी सावंत, यज्ञज्या गिरी, अंजली खोडदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास श्रीनिवास बोजा, सुनील धस,हर्षल आगळे, प्रसाद भडके, मकरंद घोडके, रामदास कोतकर, बाळासाहेब देशमुख, डॉ.सुदर्शन धस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.