Home भंडारा बोधगया महाबोधी विहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्या , लाखनीत केले होते मोर्चाचे...

बोधगया महाबोधी विहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्या , लाखनीत केले होते मोर्चाचे आयोजन

89

आशाताई बच्छाव

1001354682.jpg

बोधगया महाबोधी विहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्या , लाखनीत केले होते मोर्चाचे आयोजन

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )देशातील स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले असतानासुद्धा बोधगया महाबोधी महाविहार बौद्ध अनुयायांचा असूनही बौद्धाच्या ताब्यात नाही.बिहारमध्ये ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झाले आणि जगाला दुःख मुक्तीचा मार्ग बुध्दाला प्राप्त झाला. अशा या बुद्धत्व प्राप्तीच्या स्थळी
सम्राट अशोकाने तिसऱ्या शतकात महाबोधी महाविहार बांधले आणि त्याबरोबरच संपूर्ण भारतभर 84000 भव्य विहारांची निर्मिती केली. हल्ली ते महाविहार ब्राम्हणी तथा मनुवादी व्यवस्थेच्या ताब्यात आहे . ते त्यांच्या हातून मुक्त होऊन बौद्धांच्या ताब्यात यावे यासाठी आज लाखनी येथे भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले. दिनांक 12 फेब्रुवारी 2025 पासून देशातील भिक्षु संघाच्या वतीने बुद्धगया येथे आमरण उपोषण सुरू आहे. भन्तेजींचे स्वास्थ्य बिघडत आहे अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारने जबाबदारी स्वीकारूनकायदेशीर मार्ग काढावा असे मा. राष्ट्रपती, मा . प्रधानमंत्री इत्यादिना निवेदन देऊन कळविण्यात आले . जगातील कुठल्याही परिस्थितीत अथवा राज्यात धार्मिक स्थळ हे त्याच लोकांच्या व्यवस्थापणेकडे दिलेले आहे. त्यामुळे हे महाबोधी महाविहार बौद्धांकडे सोपविण्यात यावे. तसेच 1949 चा कायदा रद्द करावा ,यासाठी महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलन कृती समिती लाखनी यांनी सर्वव्यापी आंदोलन केले. महाप्रज्ञा बुद्धविहार ते सिंधी लाईन मार्ग बसस्थानक अशा मार्गाने पाचशे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला . त्यानंतर तहसील कार्यालयाजवळ मोर्च्याचे सभेत रूपांतर झाले. सामाजिक कार्यकर्ते तथा साहित्यिक डॉ. सुरेश खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली.या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुरेन्द्र बन्सोड, डॉ सुरेश खोब्रागडे, दीपक जनबंधू ,डी. जी. रंगारी, डॉ. रेवाराम खोब्रागडे,परमानंद मेश्राम, अचल मेश्राम, मनोज कोटांगले,अश्विनी भिवगडे, दिलीप बडोले, इत्यादी कार्यकर्त्याची अभ्यासपूर्ण भाषणे झालीत. समता सैनिक दलाचे गजेंद्र गजभिये, सी. एम. बागडे, विनोद रामटेके,आर.सी.फुल्लूके, विठ्ठल गणवीर, डॉ अविनाश नांहे सुरेश खंगार, नामदेव कानेकर, जयप्रकाश टेम्भूरने ,आशिष गणवीर, सदानंद वासनिक, अभिषेक धारगावे , नेहाल कांबळे, सुमनताई कानेकर, वीणा डोंगरे,वर्षा तीरपुडे ,नलिनी ढवळे, साधना सिंगाडे ,रामप्रसाद देशपांडे, प्राणहंस मेश्राम,सुशीला गजभिये, मंदा मेश्राम ,इंदुबाई बागडे इत्यादी शेकडो समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक जनबंधू यांनी केले. प्रास्ताविक सुरेंद्र बनसोड यांनी तर आभार सुमनताई कानेकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.