Home बुलढाणा उडविले! वेडा व्यक्ती ठरला अपघाताचा बळी! – सूसाट वाहनांना ब्रेक लागेल कधी?

उडविले! वेडा व्यक्ती ठरला अपघाताचा बळी! – सूसाट वाहनांना ब्रेक लागेल कधी?

98

आशाताई बच्छाव

1001278756.jpg

उडविले! वेडा व्यक्ती ठरला अपघाताचा बळी! – सूसाट वाहनांना ब्रेक लागेल कधी?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :– देऊळघाट दिवसागणिक अपघात वाढताहेत. मात्र सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांना ब्रेक लावण्यात वाहतूक पोलिसांना यश आले नाही. काल 26 रोजी देऊळघाटला दत्तपुर ला लागून टोल नाक्यावर रात्री 9.30 च्या सुमारास एका वेडसर व्यक्तीला (वय 35 वर्ष) एका अज्ञात वाहनाने उडविल्याने तो जागीच ठार झाला आहे.
देऊळघाट मार्गाने वाहने सुसाट धावतात. अति वेगाने धावणाऱ्या वाहनांना ब्रेक मात्र लागत नाही, ही मोठ्या चिंतेची बाब आहे. एक वेडसर व्यक्ती पायदळ दत्तपुरला लागून टोल नाक्यावरून जात असताना एका अज्ञात वाहनाने त्याला उडवले. ठार झालेल्या मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघातची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह अॅम्बुलन्स मध्ये टाकून तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी रेफर करण्यात आले.

Previous articleब्रेकिंग द बर्निंग ! दूचाकी पेटली पण…
Next articleदेगलूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाला खिंडार…..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.