आशाताई बच्छाव
देगलूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाला खिंडार…..
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम नागशेट्टीवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा पवार) गटात प्रवेश…
देगलूर तालुका प्रतिनिधी/गजानन शिंदे
देगलूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाला खिंडार,राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीतील कळती काही थांबायचे नाव घेत नाही, राज्यात महायुतीचे सरकार जनसामान्यांसाठी घेतलेल्या धोरणानां मुळे आणि जनतेचा कौल महायुतीकडे असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपले नशीब अजमावन्याच्या दृष्टीने नांदेड जिल्ह्यातील उपजिल्हा असलेल्या देगलूर नगर परिषदेत निवडणूक लढविण्याच्या उद्दिष्टाने आपली जागा आरक्षित करण्याच्या दृष्टीने हि सर्व बाब लक्षात ठेवुन व पक्षप्रमुख अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या कार्यशैलीवर प्रेरित होऊन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते व दिंगबर कौरवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम नागशेट्टीवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा पवार) गटात प्रवेश करण्यात आला यावेळी दिंगबर कौरवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुकनर यांच्या समवेत जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते..






