Home उतर महाराष्ट्र उम्मती ‘च्या वधू-वर सूचक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

उम्मती ‘च्या वधू-वर सूचक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

118

आशाताई बच्छाव

1001270460.jpg

उम्मती ‘च्या वधू-वर सूचक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद                                                           श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी 

उम्मती फाउंडेशन व रॉयल मॅरेज ब्युरो,श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मुस्लिम वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. मुस्लिम समाजातील थोर सामाजिक कार्यकर्ते दिवंगत पै. रफिकभाई शेख टीसी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात सुमारे 550 इच्छुक वधू-वरांनी सहभाग नोंदवुन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मेळाव्याचे उद्घाटन धर्मगुरु मुफ्ती रिजवान यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाचिकित्सक डॉ. वसंतराव जमधडे तर प्रमुख पाहुणे म्हणुन नजीरभाई शेख, सरवरली सय्यद, पत्रकार प्रविणकुमार आहेर, सलीम पठाण सर, जोएफ जमादार, इब्राहिम शेख, सलीम शेख उपस्थित होते. या मेळाव्यात जवळपास 550 वधू-वर यांची नोंदणी झाली असून मोठ्या संख्येने पालक वर्गही उपस्थित होता. विशेष म्हणजे या मेळाव्यातच एक लग्न सुद्धा साध्या पद्धतीने पार पडला. यावेळी उम्मतीचे सचिव डॉ.तौफिक शेख यांच्या वतीने दिव्यांगांसाठी व्हील चेयरचे वाटप देखील करण्यात आले.
उम्मतीचे अध्यक्ष सोहेल बारूदवाला यांनी प्रास्ताविकात मुस्लिम वधू- वर मेळावा घेण्यामागील भूमिका स्पष्ट केली तसेच या मेळाव्यातून जमलेल्या निवडक लग्नासाठी संस्थेतर्फे आर्थिक मदत करण्याचेही आश्वासन दिले. उद्घाटनपर मार्गदर्शन करताना मुफ्ती रिजवान यांनी यांनी इस्लाम धर्मात सर्वात पवित्र हा विवाह संस्कार असून मुलींच्या पालकांनी आपल्या मुलींसाठी फक्त श्रीमंत मुलगा एवढाच विचार न करता चारित्र्यसंपन्न, निर्व्यसनी, कर्तृत्ववान मुलगा पाहावा, असे सांगत मुस्लिम मधे सय्यद बागवान, मणियार हे सर्व एकच असुन यांच्यात भविष्यात आपापसात लग्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगतात डॉ. जमधडे यांनी आजच्या सोशल इंजिनिअरिंगच्या व्यस्ततेच्या काळात पालकांचा वेळ व पैसा वाचवण्यासाठी व आपल्या पाल्याला अनुरूप जोडीदार निवडण्यासाठी सर्वधर्म वधू-वर सूचक मेळावे अत्यावश्यक असल्याचे सांगितले तसेच मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल उम्मतीचे कौतुक केले. पत्रकार आहेर यांनी प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याला जवळचे स्थळ मिळावे, असे वाटते. आपल्या जिल्ह्यात मुस्लिम समाज विखुरलेला असताना जिल्ह्यात पहिल्यांदाच हा मेळावा घेतल्याने विशेष आनंद वाटले असे सांगितले. रॉयल मॅरेज ब्युरोचे अध्यक्ष कलीम शेख व नदीम शेख यांनी उपस्थित पालकांना व इच्छुक वधू वरांना मार्गदर्शन केले.
अ‍ॅड. आरीफ शेख यांनी सूत्रसंचालना बरोबरच मेळाव्यात उपस्थित असलेल्या पालकांना कौटुंबिक न्यायनिवाड्या संदर्भात मोफत मार्गदर्शन केले. उपाध्यक्ष फिरोज पठाण यांनी आभार मानले. मेळावा यशस्वितेसाठी शहानवाज गुलाम, असलम सय्यद, युसूफ लाखाणी, इसाक शेख, आर सोहेल, समीर शेख, माजिद मिर्जा आदींनी पुढाकार घेतला.

Previous articleस्वप्निल बापू देशमुख यांची दैनिक नवराष्ट्र संग्रामपूर तालुका प्रतिनिधी पदी नियुक्ती
Next articleआँनलाईन जुगारात पैसे हरल्यामुळे दहिवडच्या युवकांचा पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.