Home भंडारा अखिल भारतीय शिंपी समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे होणार- राष्ट्रीय अध्यक्ष भास्करराव...

अखिल भारतीय शिंपी समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे होणार- राष्ट्रीय अध्यक्ष भास्करराव टोम्पे

420

आशाताई बच्छाव

1001237197.jpg

अखिल भारतीय शिंपी समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे होणार- राष्ट्रीय अध्यक्ष भास्करराव टोम्पे

 

 

संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)अखिल भारतीय शिंपी समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन लवकरच नागपूर येथे घेण्यात येणार आहे. त्या अधिवेशनाबाबत माहीती देण्याकरीता अखिल भारतीय नामदेव क्षेत्रिय महासंघ नवी दिल्ली चे नवनिर्वाचित अध्यक्ष भास्करराव टोम्पे यांचे दिनांक 13 जानेवारी 2025 ला आगमन भंडारा येथे झाले .त्यानिमित्त शिंपी समाज भंडारा तर्फे त्यांचे स्वागत श्री.राजू मनगटे अध्यक्ष वैष्णव शिंपी समाज भंडारा यांनी केले . महासंघाचे समन्वयक श्री.अनंतराव जागंजोड यांचे स्वागत नंदकिशोर क्षीरसागर यांनी केले,विदर्भ शिंपी समाज मंडळाचे अध्यक्ष श्री.राजुभाऊ किटे यांचे स्वागत भास्करराव किटे यांनी केले. तसेच केशवराव हूड यांचे स्वागत स्वप्नील डहाके यांनी केले. सभेत शिंपी समाजातील पोटजातींना एकत्र आणून त्यांच्या सामाजिक,आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला.नुकत्याच महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या “श्री.संत नामदेव महाराज “समस्त शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळाच्या ध्येय धोरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली महामंडळाच्या माध्यमातून शिंपी समाजाचा विकास साधण्यासाठी पुढील दिशा निर्देश आगामी नागपूर अधिवेशनात ठरविण्यात येणार आहेत. पाहुण्याचे स्वागत महिला कार्यकारिणी मंडळाच्या अध्यक्षा सौ.स्मिताताई किटे,उपाध्यक्षा सौ.साधनाताई मनगटे,मार्गदर्शक सौ.संध्याताई गंधे,मंगलाताई किटे,सौ.क्षीरसागर,सौ.घडोलेयांनी केले सभेला भंडारा शिंपी समाजातील बंधू भगिनीनी मोठया संख्येनी संत नामदेव महाराज स्मारक जवळ,शास्त्री चौक भंडारा येथे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली कार्यक्रमाचे संचालन प्रदिपभाऊ गंधे यांनी केले तर सभेचे समारोप भास्करराव किटे यांनी करून सभा स॔पन्न झाली.

.

Previous articleनगर परिषद कंत्राटदार संतोष लांजेवार यांच्यावर गुन्हा दाखल; पोलिस कारवाईला सुरुवात
Next articleअतनुरात ” नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण मेळावा ” संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.