Home उतर महाराष्ट्र भगवान विश्वकर्मा यांनी निर्मिलेल्या सर्व वास्तू या निसर्ग पूरक आणि अद्भुत _शिवसेना...

भगवान विश्वकर्मा यांनी निर्मिलेल्या सर्व वास्तू या निसर्ग पूरक आणि अद्भुत _शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे.

26
0

आशाताई बच्छाव

1001226087.jpg

भगवान विश्वकर्मा यांनी निर्मिलेल्या सर्व वास्तू या निसर्ग पूरक आणि अद्भुत _शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे.

श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी-भगवान विश्वकर्मा यांनी निर्मिलेल्या सर्व वास्तू या निसर्ग पूरक आणि अद्भुत होत्या असे गौरवोद्गार शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांनी भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सांगितले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान विश्वकर्मा जयंती श्री सचिन कदम व त्यांच्या परिवारातर्फे मोठ्या आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये लोकमान्य टिळक वाचनालय यांच्यासमोर आनंदाने साजरा करण्यात आला. सुरुवातीला भगवान विश्वकर्मा यांची आरती शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे तसेच आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल यांच्या हस्ते सुरुवात करून इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते संपूर्ण करण्यात आली.
त्यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे यांनी सांगितले की संपूर्ण विश्वाचे रचता भगवान विश्वकर्मा यांनी मागील काळामध्ये ज्या अद्भुत वास्तू निर्मिला त्या खूप आश्चर्यकारक होत्या पण त्या सर्व वास्तू या निसर्ग पूरक होत्या त्या वास्तूची निर्मिती करताना निसर्गाचे कोणतेही हानी होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे त्यामुळे या क्षेत्रात जे लोक काम करत आहे त्यांनी पण भविष्यामध्ये निसर्ग पूरक वास्तू कशा निर्माण करता येतील व आपला निसर्ग व पृथ्वी यांना अजून अनेक वर्ष कसे जीवदान देता येतील त्यासाठी काम करणे गरजेचे आहे हीच खरी त्यांना आदरांजली होय असे सांगितले.
या महाआरतीनंतर महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे ,आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल, सचिन कदम ,सौ प्रिया कदम मनसेचे जिल्हाप्रमुख बाबा शिंदे, एडवोकेट सुनील शेळके, शिवसेनेचे मा शहर प्रमुख रमेश घुले, लखन कुरे ,सुनील पगारे ,रवी शिरसाट संतोष डहाळे, रवी जाधव, सुरेश बारस्कर, गणेश वाकचौरे ,दीपक यशवंत ,सचिन शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Previous articleस्वामी विवेकानंद हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय बुटखेडा शाळेचा एन.एम. एम.एस.परीक्षेचा निकाल शंभर टक्के(100%)
Next articleदेवळा तालुक्यात पोलिस अँक्शन मोडवर, वाळू माफीयांची धाकधूक वाढली!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here