Home भंडारा ॲड.डॉ.सत्यपाल कातकर ह्यांच्या आंबेडकरवाद आणि दलित आत्मकथने पुस्तकाचे विमोचन

ॲड.डॉ.सत्यपाल कातकर ह्यांच्या आंबेडकरवाद आणि दलित आत्मकथने पुस्तकाचे विमोचन

104

आशाताई बच्छाव

1001130707.jpg

ॲड.डॉ.सत्यपाल कातकर ह्यांच्या आंबेडकरवाद आणि दलित आत्मकथने पुस्तकाचे विमोचन

संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)राजुरा येथील रहिवाशी सर्वोच्च शिक्षित प्रसिद्ध मनोवैज्ञानिक,माजी प्राचार्य,ॲड.डॉ.सत्यपाल रा.कातकर लिखित तिसऱ्या पुस्तकाचे भीमा कोरेगाव शौर्य दिनी १ जानेवारी २०२५ ला समता सैनिक दल शाखा राजुरा द्वारा आयोजित कार्यक्रमात विमोचन तथा लोकार्पण करण्यात आले, ह्यापूर्वी त्यांचे पहिले पुस्तकं संयुक्तरित्या बुद्धिजम अँड दलित सोसियल फिलॉसॉफी अँड ट्रेडिशन मध्ये एज्यूकेशनल प्रॉलिसीस अँड प्रोग्रामस फॉर दलित ह्यावर त्यांनी लिखाण केले ज्यात प्रोफेसर डॉ.सी.डी.नाईक,महू मध्यप्रदेश,डॉ. नितीन राऊत, माजी कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य व डॉ. सत्यपाल कातकर हे तीन लेखक आहेत व सदर पुस्तक कल्पझ पब्लिकेशन, दिल्ली द्वारे प्रकाशित झाले आहे दुसरे स्वलिखित पुस्तक एज्युकेशनल फिलॉसॉफी ऑफ डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक वाण्या पब्लिकेशन,कानपुर व आंबेडकरिजम अँड दलित ऑटोबायोग्राफी हे तिसरे पुस्तक इटरेटिव्ह इंटरनॅशनल पब्लिशर, चिकमंगळरू,कर्नाटक येथून नुकतेच प्रकाशित झाले आहे.राजुरा तहसील मधील चनाखा सारख्या खेडे गावात जन्म घेऊन सुद्धा तिनही पुस्तके आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंग्लिश भाषेमध्ये लिहिली असून तिनही पुस्तके अमेझॉन, प्लिफकॉर्ट वरती उपलब्ध आहेत,विशेष म्हणजे तिनही पुस्तके इंग्लिश मध्ये लिहून राजुरा शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर त्यांनी उंचावले आहे,सदर पुस्तकाचे विमोचन मार्शल ॲड.गौतम खरतडे,यवतमाळ, अविनाश जाधव,सचिव,आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ,राजुरा, विजय मोरे,अध्यक्ष,बळीराजा नागरी पतसंस्था,राजुरा,
भानुदास पोपटे,सर, नेरी आणि मार्शल निवारण कांबळे सर हयांचे उपस्थित विमोचन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन मार्शल विवेक बक्षी सर ह्यांनी केले.सदर कार्यक्रमास शहरातील बहुसंख्य नागरिक व समता सैनिक दलाचे सैनिक उपस्थित होते.ॲड.डॉ.सत्यपाल कातकर ह्यांच्या पुस्तकाचे विमोचन करण्याचे श्रेय समता सैनिक दल,राजुरा शाखेने घेतले ह्याबद्दल शहरातील नागरिक त्यांचे व लेखकाचे सर्वत्र कौतुक केल्या जाते.

Previous articleसुजाता कन्या विद्यालय अड्याळ येथे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहत संपन्न
Next articleमाहोरा येथे पत्रकार दिनानिमित्त ग्रामसंसद कार्यालयात पत्रकारांचा सत्कार !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.