Home बुलढाणा संग्रामपूर तालुक्याचे तहसीलदार प्रशांत पाटील यांची धडाकेबाज कारवाई ! देउळगाव नदीपात्रा मध्ये...

संग्रामपूर तालुक्याचे तहसीलदार प्रशांत पाटील यांची धडाकेबाज कारवाई ! देउळगाव नदीपात्रा मध्ये अवैद्य रेती वाहन पकडत केला गुन्हा दाखल …

126

आशाताई बच्छाव

1001128989.jpg

संग्रामपूर तालुक्याचे तहसीलदार प्रशांत पाटील यांची धडाकेबाज कारवाई ! देउळगाव नदीपात्रा मध्ये अवैद्य रेती वाहन पकडत केला गुन्हा दाखल …
स्वप्निल देशमुख
संग्रामपूर :- तालुक्याच्या हद्दीमध्ये अवैद्य रेती वाहतूक करणारे वाहन पकडून कारवाई करत गुन्हे दाखल केल्याने रेती माफियांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्याचा विषय चर्चेचा झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, संग्रामपूर तालुक्यात दररोज अंदाजे ५० वाहने हे दिवसरात्र अवैद्य रेती वाहतूक करीत सीमा ओलांडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये घुसतात. अवैद्य रेती उपसा आणि वाहतुकीमुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असल्याने याला पायबंद घालण्यासाठी संग्रामपूर तालुक्याचे दबंग तहसीलदार प्रशांत पाटील हे एक्शन मोड आले आहेत. त्यांनी नियोजनबद्ध रेती माफियांवर कारवाई चा धडाका लावला असल्याचे दिसून येत आहे.संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या पथकाने देउळगाव नदीपात्रात धाड टाकून दोन ट्रॅक्टर जप्त केल्याची धडक कारवाई समोर आली आहे. सविस्तर वृत्त अशे की, आज दि.७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता देऊळगाव पूर्णा नदी पात्रात दोन ट्रॅक्टर विना परवाना रेतीची वाहतुक करतांना आढळून आले. तहसीलदार यांनी ट्रॅक्टर चालकास विचारपूस केली असता वाहतुक परवाना आढळून आला नाही. सदर वाहन सतीश रामदास परघरमोर रा. देऊळगावं यांच्या मालकीचे असून चालक अमोल बळीराम हतोळे रा. स्वरूपखेड हा चालवत होता. तसेच दुसरे ट्रॅक्टर सुभाष रामराव पोहरे रा. उरळ जि. अकोला यांच्या मालकीचे असून चालक अजय शहादेव म्हस्के रा. स्वरूपखेड हा चालवत होता. सदर वाहनांचा पंचनामा करून वाहन पोलीस स्टेशन तामगाव येथे जमा करण्यात आले. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सदर कारवाई संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील, रवींद्र बोराखडे मंडळ अधिकारी बावनबीर, प्रदिप नलावडे ग्राम महसूल अधिकारी, सुनील कुसळकर ग्राम महसूल अधिकारी यांनी केली.
सदर धडक कारवाई मुळे अवैद्य रेती वाहतूक करणाऱ्या रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.

Previous articleपत्रकारांनी खात्री करूनच बातमी प्रकाशित करावी-आ.खोतकर
Next articleचित्तेकनार गावातील समस्या सोडवा… आमदार डॉ मिलिंद नरोटे यांना माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती तर्फे निवेदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.