Home गडचिरोली चित्तेकनार गावातील समस्या सोडवा… आमदार डॉ मिलिंद नरोटे यांना माहिती अधिकार व...

चित्तेकनार गावातील समस्या सोडवा… आमदार डॉ मिलिंद नरोटे यांना माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती तर्फे निवेदन

231

आशाताई बच्छाव

1001130694.jpg

चित्तेकनार गावातील समस्या सोडवा…

आमदार डॉ मिलिंद नरोटे यांना माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती तर्फे निवेदन

चित्तेकनार गावातील विविध समस्यावर केली चर्चा

दिं 07/01/2024

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ: चामोर्शी तालुक्यातील चित्तेकनार गाव शासकीय योजने पासून व लाभापासून गावातील कित्येक नागरिक वंचित आहेत व त्या गावांमध्ये अनेक समस्यांचा डोंगर असल्या कारणाने गावातील विविध समस्या घेऊन माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती तर्फे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांना निवेदन देण्यात आले

 

पिण्याच्या पाण्याची टाकी फक्त शोभेची वस्तु बनली आहे, नळाला अद्यापही पाणी येत नाही, गावात घरोघरी नळ योजना सुरू करा, घरकुल योजने पासून वंचित असलेल्या गरजू कुटुंबाना घरकूल द्या,
गावातील विकास कामावर भर देऊन सी सी रोड व नाली बांधकाम करा, चित्तेकणार ते पूले नदीपर्यंत रोड रुंदीकरण करा, सभामंडपाची तसेच गावामध्ये सामूहिक शौचालयाचे बांधकाम करा,
युवा तसेच सुशिक्षित, शिक्षित मुलांना व्यायाम शाळा, अभ्यासिका, क्रीडांगण उपलब्ध करून द्या, जिल्हा परिषद शाळेला संरक्षण भिंत नसल्याने ते त्वरीत मंजूर करून बांधकाम करावे, आदिवासी परंपरा प्रमाने कुर्माघराची गरज, 2006 अतिक्रमण वनपट्टे मिळाले नाहीत अशा लोकांना त्वरीत वनपट्टे मिळवून द्यावे,
गावामध्ये वाढीव विद्युत पोल तसेच चौकात लाईट व्यवस्था उपलब्ध करून द्यावे
तलाठी सज्जा क्र. 2 चे तलाठी हे नेहमी गैरहजर असतात, तसेच मुख्यालय राहत नाही, त्यामुळे नागरिकांचे वेळेवर काम होत नाही
कुथेगाव ग्रा.प. अंतर्गत झालेल्या संपूर्ण नाली बांधकामचे कितेक वर्षा पासून उपसा झालेले नाही.

सर्व समस्यांकडे गाभीर्याने लक्ष देऊन सर्व समस्यां तातडीने सोडवाव्यात या उद्देशाने निवेदन देऊन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.

 

यावेळी समितीचे जिल्हा अध्यक्ष श्री.मनोज उराडे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. सूरज गुंडमवार, जिल्हा सचिव रोशन कवाडकर, शहर प्रमुख श्री. कमलेश बोरूले उपस्थित होते