Home भंडारा शेतकरी, शेतमजूर ,श्रावणबाळ वृद्ध विधवा महिला व दिव्यांग, निराधार यांचे 6 महिन्यापासून...

शेतकरी, शेतमजूर ,श्रावणबाळ वृद्ध विधवा महिला व दिव्यांग, निराधार यांचे 6 महिन्यापासून थकीत असलेले मानधन तात्काळ द्या

163

आशाताई बच्छाव

1001124232.jpg

शेतकरी, शेतमजूर ,श्रावणबाळ वृद्ध विधवा महिला व दिव्यांग, निराधार यांचे 6 महिन्यापासून थकीत असलेले मानधन तात्काळ द्या

जिल्हाधिकारी मार्फत प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांना विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीतर्फे निवेदन सादर

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) आज दिनांक 6 जानेवारी 2025 ला विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शेतकरी, शेतमजूर ,श्रावणबाळ , वृद्ध विधवा महिला व दिव्यांग, निराधार यांचे मागील 6 महिन्यापासून थकीत असलेले मानधन तात्काळ देण्यात यावे या मागणी करिता भंडारा जिल्हाधिकारी मार्फत भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदानंद हारगावे व उपाध्यक्ष नम्रता ताई बागडे यांच्यामार्फत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले .देण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये शेतकरी, शेतमजूर ,श्रावणबाळ ,वृद्ध विधवा महिला व दिव्यांग, निराधार यांना सन 1994 च्या किमान सन्मान पेन्शन योजना अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 6000 रुपये मासिक महिना देण्यात यावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, व भूमिहीन लोकांना घराचे पट्टे देण्यात यावे ,सन 2006 ला झालेल्या शेतकऱ्यांच्या हिताचा स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा, शेतकऱ्याला बी बियाणे 50 टक्के सबसिडीवर देण्यात यावे ,शेतकऱ्याला विज बिल माफ करण्यात यावे अशा विविध मागण्यांकरिता निवेदन देण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीमार्फत बेमुदत आमरण उपोषणआंदोलन दिनांक 25 फरवरी 2025 ला त्रिमूर्ती चौक भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येईल व या आमरण उपोषणाची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील असेही निवेदनातून कळविण्यात आलेले आहे. या निवेदनाची प्रतिलिपी जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा यांना सुद्धा देण्यात आलेली आहे. निवेदन देताना विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सदानंद धारगावे ,उपाध्यक्ष नम्रताताई बागडे, सीमा काळे ,सीमा सुखदेवे, विंनता बागडे, कंचना बागडे, करुणा बागडे, पुष्पा रोडगे , वजंता वालकर ,बिंदू वालदे ,शशिकला कांबळे ,जयवंत बागडे ,कविता मेश्राम, मनोरमा रामटेके, हिताबाई राऊत ,शांताबाई रामटेके, रंजना बडोले ,पांडुरंग नंदागवळी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleब्रेकिंग – शिवारात – आढळले कोरियन भाषेत लिहिलेले यंत्रः काय आहे सत्य? मेहकरजवळील शिवारात खळबळ – शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण!
Next articleचाळीसगाव महाविद्यालयात लेखक वाचक संवाद कार्यक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.