
आशाताई बच्छाव
वसमत शहरात वानरानी मानव वस्तीत येऊन दिले माणूसकीचे दर्शन
हिंगोली, श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ -जिल्ह्यातील वसमत शहरात छत्रपती शिवाजी चौक या भागात आज दुपारी एक वाजून 40 मिनिटास
एका वनराणी बचत गट मार्केट यार्ड इमारतीजवळ असलेल्या प्रवेश केला ही इमारत वसमत शहरातील नगरपालिका च्या गार्डनला लागून असल्याने गार्डन मधील कंपाउंड वॉलच्या साईटला असलेल्या झाडावरून झेप घेऊन सरळ महिला बचत गटाच्या ऑफिसच्या समोर येऊन थांबला त्यानंतर माणुसकी या नात्याने महिला बचत गटाच्या कार्यालयात असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या ऑफिसच्या दरवाजा बाहेर वन थांबले म्हणून त्यांनी दररोज आणत असलेल्या दुपारच्या जेवणातील डब्यामधून एक दीड पोळी काढून त्या वानराला खायला दिली त्यानंतर त्याला पाणीही पाजले पण तो सैरावैरा धावणारा या झाडावरून त्या झाडावर वानर मात्र त्याच ठिकाणी दीड दोन तास बसून राहिला त्यामुळे या ऑफिसमध्ये व बाजूच्या दुकानात येणाऱ्या सर्वच ग्राहक व कर्मचारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने लोकांनी बघ्याची भूमिका घेतली पण हा झाडावर नेहमी उड्या मारणारा प्राणी एकांत व निवांत माणसांमध्ये येऊन बसला व आपले दोन्ही पाय पाणी फिल्टर च्या त्यांच्या स्टूलवर ठेवूनम्हणून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडं बघत होता व लोकांच्या हालचाली जाणून घेत होता अनेकांनी त्याला खायला दिले बिस्किट दिले त्याने मनसोक्त मनाने ते खाऊन निवांतपणे मानव वस्तीत थांबून राहिला त्यामुळे अनेकांच्या मनावर वेगळ्याच भावना तयार झाल्या की पशूला आपलंसं केल्याच्या नंतर जंगली जानवर व पशुपक्षी आपले होतात त्याला मानवतेची सुद्धा गरज आहे त्यामुळे अनेकांनी वानराच्या या खाली उतरून मानव जातीत निवांत निवारा घेण्यासाठी बसलेल्या वानरानी आपले दर्शन दिले.