आशाताई बच्छाव
जुना जालना परिसरातील रिक्षा चोरी गुन्ह्यातील एक आरोपीस ताब्यात घेऊन 90,000/ रुपये किमतीची रिक्षा केली जप्त.
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 02/01/2025
जालना जिल्ह्यातील मालाविरुद्ध गुन्हे उघड करणे बाबत मा. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सूचना दिल्याने जालना शहरात मालाविरुद्धचे गुन्ह्याबाबत माहिती घेत असताना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, पोलीस ठाणे कदीम जालना येथे दिनांक 19/.12./2024 रोजी बजाज ऑटो कंपनीचा रिक्षा चोरी गेल्यावरून पोलीस ठाणे कदीम जालना येथे गु.र.न. 510/ 2024 कलम 303 (2 )भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर चोरी गेलेली रिक्षा ही आमदरी, ता. औंढा नागनाथ येथील आरोपी नागोराव महादेव पोटे यांने चोरी केलेली आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने औंढा नागनाथ येथे जाऊन आरोपी नागोराव माधवराव पोटे वय 40 वर्षे राहणार आमदरी ता. कळमनुरी जि. हिंगोली यास ताब्यात घेऊन त्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देऊन सदर गुन्ह्यातील बजाज ऑटो कंपनीची काळ्या रंगाची रिक्षा क्र एम. एच .21 बी जी 11 84 रिक्षा आरोपीने काढून दिल्याने ती जप्त करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, पोउनि राजेंद्र वाघ, पोलीस अमलदार रामप्रसाद पव्हरे, गोपाल कौशिक, सागर बाविस्कर, इरशाद पटेल, रमेश राठोड, रमेश काळे सर्व स्थागुशा जालना यांनी केली आहे.






