Home बीड बीड शहरच्या रेल्वे स्टेशनवर २६ जानेवारीला रेल्वे येणार म्हणजे येणार – खा....

बीड शहरच्या रेल्वे स्टेशनवर २६ जानेवारीला रेल्वे येणार म्हणजे येणार – खा. बजरंग सोनवणे

229

आशाताई बच्छाव

1001104547.jpg

बीड शहरच्या रेल्वे स्टेशनवर २६ जानेवारीला रेल्वे येणार म्हणजे येणार – खा. बजरंग सोनवणे

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड दि. ३१ डिसेंबर २०२४ बीड जिल्ह्यातील जनतेने पाहिलेले रेल्वेचे स्वप्न ५० वर्षानंतर सत्यात उतरताना दिसत असून, अहमदनगर – बी – परळी रेल्वे मार्ग आता पूर्णतत्वाच्या दिशेने दिसत आहे. यापूर्वी अहमदनगर ते विघनवाडी (ता. शिरूर का.) पर्यंत रेल्वे चाचणी झाली होती. या मार्गावर काही दिवस रेल्वे धावलीही पण बीड तालुक्यात रेल्वे कधी येणार याकडे बीडकरांचे लक्ष लागले होते. अखेर सोमवारी दि. ३० डिसेंबर हा दिवस उजाडला आणि बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथे रेल्वे दाखल झाली. विघनवाडी ते नवगण राजुरी पर्यंत हायस्पीड रेल्वे चाचणी घेण्यात आली. यावेळी खा. बजरंग सोनवणे यांची उपस्थिती होती. त्यांनी यावेळी रेल्वे इंजिनचे पूजन करून हिरवी झेंडी दाखवून चाचणी घेण्यात आली. यामुळे माध्यमांशी बोलताना खा . बजरंग सोनवणे म्हणाले की, आज आनंदाचा दिवस असून, बीड जिल्ह्यातील जनतेचे रेल्वेचे स्वप्न साकार करण्यासाठी रेल्वे कृती समितीने खूप मेहनत घेतली, लढा दिला हे त्याचे फलित असून, कृती समितीचे आभार मानले. तर बीड जिल्ह्याचा खासदार होऊन मला सहा महिने झाले. माझ्या या सहा महिन्यांच्या कार्यकाळात ६० कि. मी. काम पूर्ण केले. आज विघनवाडी ते नवगण राजुरी हाय स्पीड चाचणी पूर्ण झाली. आता केवळ बीड १० कि. मी. अंतरावर असून हे काम महिन्याभरात पूर्ण करून येत्या २६ जानेवारी २०२५ पर्यंत काम पूर्ण करून बीड शहरच्या स्टेशनवर रेल्वे येणार म्हणजे येणार असा विश्वास व्यक्त केला. आजचा हा दिवस आनंदाचा असल्याचे म्हटले तसेच रेल्वे अधिकाऱ्यांचे आभार मानले.

Previous articleपरळी शहरात फ्युज बॉक्स उघडे; नागरिकांच्या जिवितास धोका – अँड.मनोज संकाये
Next articleगुन्हे शाखेचे नेवाशात सुगंधीत तंबाखू विक्रेत्यांवर छापे नेवासा शहरात मावा व सुगंधीत तंबाखू विक्री
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.