आशाताई बच्छाव
परळी शहरात फ्युज बॉक्स उघडे; नागरिकांच्या जिवितास धोका – अँड.मनोज संकाये
महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेऊन उपाययोजना कराव्यात!
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/परळी दि.३१ डिसेंबर २०२४ रोजी परळी शहरांमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्र (डीपी) मधील फ्युज बॉक्स उघडे पडलेले विविध ठिकाणी दिसून येत आहेत. ते अतिशय भयानक असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याचा संभव निर्माण झाला आहे. याची महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घ्यावी आणि योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी केली आहे. परळी शहरांमध्ये जागोजागी विविध ठिकाणी अनेक भागांमध्ये फ्युज बॉक्स उघडे असल्याचे चित्र समोर आले आहे. रहदारीच्या ठिकाणी तर असे सर्रास पाहायला मिळत आहे. नागरिकांच्या जीवितास यामुळे धोका निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तरी काही विपरीत घटना घडू नये म्हणून योग्य ते उपाययोजना महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ करणे गरजेचे आहे. फ्युज बॉक्स मध्ये व्यवस्थितपणे फ्युज बसविलेले नाहीत तर काही ठिकाणी नुसत्या तारा फ्यूज म्हणून वापरल्या जात आहेत. शॉर्टसर्किटमुळे किंवा उघड्या फ्युज बॉक्स मुळे नागरिकांना नकळतपणे विद्युत शॉक बसू शकतो त्यामुळे व्यक्ती अथवा मोकाट जनावरे दगावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महावितरण कार्यालयाच्या परळी येथील उपअभियंता तसेच इतर प्रमुख अधिकाऱ्यांनी यामध्ये काळजीपूर्वक वेळेत लक्ष घालून योग्य त्या उपाययोजना कराव्यात अन्यथा मित्र मंडळाच्या वतीने तीव्र आंदोलन महावितरण कार्यालयासमोर करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.






