Home बुलढाणा क्राईम ! 11 ‘जड’ गुन्हे असलेला ‘बारक्या’ जेरबंद !

क्राईम ! 11 ‘जड’ गुन्हे असलेला ‘बारक्या’ जेरबंद !

91

आशाताई बच्छाव

1001102351.jpg

क्राईम ! 11 ‘जड’ गुन्हे असलेला ‘बारक्या’ जेरबंद !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा:- सिंदखेडराजा खून, जबरी चोरी अशा तब्बल 11 गुन्हे दाखल असलेल्या ‘बारक्याला’ एसपींच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अनेक
गुन्हेगार मोकाट आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यापैकी एक खुन, चोरी, जबरी चोरी अशा गंभीर मालमत्तेच्या गुन्ह्यांतील फरार आरोपी पवन उर्फ बारक्या पवार रा. सिंदखेड राजा याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. पवन उर्फ बारक्या मनोहर पवार वय 24 वर्ष रा. सिं. राजा याला ताब्यात घेऊन एकुण 11 गुन्हे उघडकीस आले आहे. ही कार्यवाही पीएसआय सचिन कानडे, पीएसआय प्रताप बजाड, शरद गिरी, शेख चाँद, पुरुषोत्तम आघाव, गणेश पाटील, युवराज राठोड, मंगेश सनगाळे, गजानन गोरले, दिपक वायाळ, विजय सोनोने, आशा मोरे, शिवानंद मुंढे, टेकाळे, हेलगे राजू आडवे, ऋषिकेश खंडेराव यांनी केली आहे.