Home बुलढाणा ब्रेकिंग ! गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता मोटार वाहनांवरील ‘हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट!’ –...

ब्रेकिंग ! गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता मोटार वाहनांवरील ‘हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट!’ – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे म्हणाले..!

109

आशाताई बच्छाव

1001102338.jpg

ब्रेकिंग ! गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता मोटार वाहनांवरील ‘हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट!’ – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे म्हणाले..!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा महाराष्ट्रातील 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर उच्च
सुरक्षा वाहन क्रमांक प्लेट (हाय सिक्युरिटी नंबरप्लेट
HSRP) बसविणे बंधनकारक करण्याचे वरिष्ठ
देशिक परिवहन
– HSRP) बसावण बधनकारक करण्याच वारष्ठ

स्तरावरून निर्देश असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे म्हणाले आहेत. त्यानुसार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत वाहनांवर एचएसआरपी हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविणे बंधनकारक असून 31 मार्च 2025 पूर्वी ही नंबरप्लेट बसविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एचएसआरपी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी परिवहन विभागाकडून बुलढाणा उपप्रादेशिक कार्यालयात झोन 3 मध्ये मे. एफटीए एचएसआरपी सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असून त्यासाठी
लागणारे शुल्कही निर्धारित करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून अशा नंबरप्लेट बसविण्याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत.

राष्ट्रीय सुरक्षेसह वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी व्हावेत, छेडछाड आणि बनावटगिरी रोखण्यासाठी, तसेच रस्त्यांवर चालणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची ओळख पटविण्याकरिता या व अशा अनेक प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मोटार वाहनांवरील हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट बसविणे अत्यावश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील सर्व मोटार वाहनांवर अशा नंबरप्लेट बसविण्याबाबत निर्देश जारी केले आहेत. राज्यात सन 2019 पासून नव्या उत्पादित वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट सक्तीची केली आहे. वाहनाला ही नंबरप्लेट एकदा लावल्यानंतर ती पुन्हा काढता येत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनविण्यात आलेली नंबरप्लेट टॅम्परप्रुफ असते. ही नंबरप्लेट अल्युमिनिअम मिश्र धातूपासून बनविलेली असते. या नंबरप्लेटवर निळ्या रंगाच्या चक्राचे
होलोग्राम आणि वाहन क्रमांकाच्या काळ्या तिरप्या ओळीत IND अशी अक्षरे लिहिलेली असतात.

• HSRP बुकिंग पोर्टल लिंक वर..

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणा करीता Zone 3 मध्ये M/s FTA HSRP Solution Ptv Ltd. ही एजन्सी असून HSRP बुकींग पोर्टल लिंक http://maharashtrahsrp.com आहे.

तसेच

याकरीता नेमण्यात आलेल्या पुरवठादाराची यादी या कार्यालयाच्या सुचनाफलकांवर लावण्यात आली आहे. याकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा http://maharashtrahsrp.com या लिंकवर देण्यात आली आहे, तसेच सदर अर्जाचे शुल्काचा भरणा ऑनलाईन करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बुलढाणा ज्ञानेश्वर हिरडे यांनी केले आहे.

Previous articleसार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल
Next articleक्राईम ! 11 ‘जड’ गुन्हे असलेला ‘बारक्या’ जेरबंद !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.