Home भंडारा आईंच्या पार्थिवावर नानांचा टाहो… स्व. मिराबाई फाल्गुनराव पटोले अनंतात विलीन ; राज्यातील...

आईंच्या पार्थिवावर नानांचा टाहो… स्व. मिराबाई फाल्गुनराव पटोले अनंतात विलीन ; राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची शोकसभेत हजेरी

479

आशाताई बच्छाव

1001097324.jpg

आईंच्या पार्थिवावर नानांचा टाहो…

स्व. मिराबाई फाल्गुनराव पटोले अनंतात विलीन ; राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची शोकसभेत हजेरी

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व साकोली आमदार नाना पटोले यांच्या मातोश्री मिराबाई फाल्गुनराव पटोले यांचे रविवारी ता. २९ डिसेंबर पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचेवर अंतिम संस्कार स्वगावी सुकळी चुलबंद नदी घाटावर करण्यात आले. सुकळी स्वगावी आईंच्या पार्थिवावर आमदार नाना पटोले यांनी अक्षरशः टाहो फोडला. अश्रृमय झालेल्या नानांना काही राज्यातील आलेल्या नेत्यांनी त्यांना धीर दिला. तर अंत्ययात्रेतही नाना पटोले हे आपले अश्रु आवरू शकले नाही. साहजिकच आहे आईंच्या प्रेमळ कुशीत लहानाचे मोठे झालो, बोट धरून चालायला लागलो त्या मातोश्रींची सावली आज नाही हेच अश्रृमय दुःख याप्रसंगी नानांच्या चेह-यावर दिसत होते. दरम्यान दू. ०३ वा. शोकसभेला राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती.

स्व. मिराबाई फाल्गुनराव पटोले यांचे निधनाचे वृत्त सोशल मिडीयातून कळताच साकोलीसह भंडारा, नागपूर अमरावती, गोंदिया, अकोला आणि महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सुकळी/महालगाव येथे लवकर येण्याचे केले. दूपारी ०२:३० ला निघालेल्या अंत्ययात्रेला जनसमुदाय लोटला होता. चुलबंद नदी घाटावर अंतिम संस्कार पश्चात घेण्यात आलेल्या शोकसभा व सामुदायिक श्रद्धांजली प्रसंगी माजी खासदार मधूकर कुकडे, खा. डॉ. प्रशांत पडोळे, माजी मंत्री नाना पंचबुद्धे, विपस आमदार डॉ. परीचय फुके, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नाना गावंडे, माजी खा. सुनील मेंढे, माजी आ. चरण वाघमारे, अविनाश ब्राह्मणकर, डॉ. सोमदत्त करंजेकर, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, भंडारा कॉंग्रेसचे मोहन पंचभाई, माजी आमदार दिलीप बन्सोड, जि.प.स. मदन रामटेके, माहेश्वरी नेवारे, साकोलीचे डॉ. अशोक कापगते, दिलीप मासूरकर, छाया पटले, पुष्पा कापगते, नितीन खेडीकर, अश्विन नशिने, किशोर पोगडे, चंद्रकांत वडीकार, दिलीप निनावे, आनंद सोनवाने, अनिल मुरकुटे यांसह जिल्ह्यातील आणि नागपूर विभागातील सर्वपक्षीय नेते व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी येथे उपस्थिती दर्शविली होती. शोकसभेला संचालन डॉ. अजयराव तुमसरे यांनी केले. साकोली – लवारी – उमरी – महालगांव – सुकळी – वडद – सावरबंद साकोली अश्या मार्गस्थ रोडवर वाहतूक व्यवस्था साकोली वाहतूक पोलीसांनी सांभाळली होती.

Previous articleदारूच्या पार्टीची आगळीवेगळी बात; दादा ठाकूरच्या डोक्यात लाकडी दांडके टाकून केला त्याचा घात..!
Next articleवयाच्या ३६ वर्षी नांदगावचे अष्टपैलू खेळाडू संजय लोने अनंतात विलिन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.