आशाताई बच्छाव
शनिवारी वत्सगुल्म नगरीत रंगणार यादे रफी गीत स्पर्धा
स्व. मोहम्मद रफी जन्मशताब्दी वर्ष : नवनिर्माण फाऊंडेशनचा राज्यस्तरीय उपक्रम : हजारोेे रुपयाच्या बक्षीसाची लयलुट
वाशीम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ- स्वर्गीय गायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नवनिर्माण फाऊंडेशन वाशीमच्या वतीने शनिवार, २८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता स्थानिक मन्नासिंह चौकातील स्वागत लॉन येथे यादे रफी गीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विजयी स्पर्धकांसाठी हजारो रुपयांच्या बक्षीसांची लयलुट करण्यात आली आहे. तसेच सायंकाळी ६ वाजता निमंत्रित पाहूण्यांचा स्वागत व सत्कार कार्यक्रम पार पडेल.
याप्रसंगी आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. श्याम खोडे, उद्घाटक म्हणून कळमनुरीचे आ. संतोष बांगर, प्रमुख अतिथी म्हणून रिसोडचे आ. अमित झनक, शिक्षक आ. अॅड. किरण सरनाईक, प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राजु पाटील राजे, माजी नगराध्यक्ष अशोक हेडा, भाजपाचे प्रदेश सचिव लखनसिंह ठाकुर, विशेष उपस्थितीमध्ये आरटीओ अधिकारी संग्राम जगताप, जि.प.चे दिनकर जाधव, मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती राहील.
ही स्पर्धा पुरुष, महिला, अपंग व बालगट अशा चार गटात विभागण्यात आली आहे. महिला गटात प्रथम पुरस्कार एकवीस हजार एक, व्दितीय पुरस्कार पंधरा हजार एक तर तृतीय पुरस्कार अकरा हजार एक रुपये ठेवण्यात आले आहेत. पुरुष गटात प्रथम पुरस्कार एकवीस हजार एक, व्दितीय पंधरा हजार एक व तृतीय पुरस्कार अकरा हजार एक असे ठेवण्यात आले आहे. दिव्यांग गटामध्ये प्रथम पुरस्कार आठ हजार एक, व्दितीय सात हजार एक, तृतीय सहा हजार एक, बाल गटासाठी प्रथम पुरस्कार सात हजार एक, व्दितीय सहा हजार एक व तृतीय पुरस्कार पाच हजार एक असे जाहीर करण्यात आले आहे. तसेच सहभागी कलावंतांचा उत्साह वाढविण्यासाठी व्हॉईस ऑफ वाशीम महिला पुरस्कार राशी पाच हजार एक, व्हॉईस ऑफ वाशीम पुरुष पाच हजार एक, विशेष ज्युरी पुरस्कार पाच हजार एक, श्रोते प्रोत्साहनपर पुरस्कार पाच हजार एक, बेस्ट क्लासिकल सिंगर पुरस्कार पाच हजार एक व लता मंगेशकर स्मृति पुरस्कार पाच हजार एक रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. यासोबतच प्रत्येकी अकरा हजार असे ११ पुरस्कारही प्रोत्साहनपर ठेवण्यात आले आहेत. यासोबतच प्रत्येक सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र व इतर इतर भरपूर प्रोत्साहनपर बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. तसेच स्व. निमिष मसरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक प्रथम विजेत्या स्पर्धकास तबला संच भेट देण्यात येईल. स्व. दुर्गासिह ठाकुर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुकेश ठाकुर यांच्या वतीने विशेष स्मृतीचिन्ह देण्यात येईल. या स्पर्धेत गायनपुर्व चाचणीव्दारे निवडलेले महाराष्ट्राच्या विविध भागातील स्पर्धक आपली कला व गायनकौशल्य स्पर्धेत सादर करतील. हा कार्यक्रम श्रोत्यांसाठी निशुल्क ठेवण्यात आला आहे. तरी या स्पर्धा कार्यक्रमाला रसिकांनी बहूसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्याम बढेल, उपाध्यक्ष महादेव हरकळ, सचिव मनोहर मानतकर, सहसचिव लक्ष्मण बढेल, कोषाध्यक्ष एन.जी. मसरे, संघटक जितु बढेल, सदस्य उमेश मोहळे, विधी सल्लागार रोहीत बढेल, रुपेश बढेल, तोताराम बढेल, मनोज बढेल, पवन शर्मा आदींनी केले आहे.






