आशाताई बच्छाव
जालन्यात श्वानांसह पाळीव प्राण्यांचे मोफत लसीकरण व आरोग्य तपासणी
जालना/ दिलीप बोंडे ब्युरो चीफ
जूना जालना, गांधी चमन परिसरातील समर्थ पेट शॉपतर्फे 22 डिसेंबर रोजी श्वान व इतर 400 प्राण्यांचे लसीकरण व आरोग्य तपासणी श्वान प्रेमी नितीन इंगळे व डॉ.मुकूंद जमधडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
10 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सदरील लसीकरण व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी विविध जातीचे मांजर व श्वान,पाळीव जनावरांची मोफत आरोग्य तपासणी करून लसीकरण करण्यात आले.यावेळी समर्थ पेट शॉपचे संचालक नितीन इंगळे, डॉ. मुकुंद जमधडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी मॉ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वानखडे, सुभाष पवार, धरम इंगळे लक्ष्मण वानखडे, सचिन वाघमारे, किरण गरड, सुनील पवार ,रामेश्वर जावळे ,अनिकेत वाघमारे, वैभव वानखेडे, सचिन वानखेडे, अनिकेत वाघमारे, रामेश्वर इंगळे, सचिन जैवळ यांच्यासह शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.