आशाताई बच्छाव
मोहन इंगळे यांना उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार जाहीर
—————————————-
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) ग्राहकांच्या हितार्थ उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जालना येथील जिल्हा ग्राहक पंचायतचे अध्यक्ष मोहन इंगळे यांना या वर्षीचा कै.अरुण भार्गव पुरस्कृत राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
जालना येथील सनराईज राजस्थानी हॉटेलचे संचालक तथा जालना जिल्हा ग्राहक पंचायतचे अध्यक्ष मोहन इंगळे यांनी ग्राहक पंचायत व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ग्राहकांना न्याय देण्यासाठी मागील कालावधीत अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले आहेत. ग्राहकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आयोजित जिल्हा ग्राहक पंचायतच्या बैठकीत इंगळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधन्याचा प्रयत्न वेळोवेळी केलेला आहे. ग्राहक हितासाठी केलेले प्रयत्न आणि राबवलेले उपक्रम या कार्याची दखल घेऊन ग्राहकतिर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सन २०२४ या वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या कै. अरुण भार्गव पुरस्कृत राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार जालना जिल्हा ग्राहक पंचायतचे अध्यक्ष मोहन इंगळे यांना जाहीर करण्यात आला आहे. या शिवाय राज्यातून सुधाकर भदरगे कोल्हापूर, श्रीराम सातपुते नागपूर, संदेश सावंत रत्नागिरी, गजेंद्र क्षीरसागर अहिल्यानगर यांनाही सदर पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून आगामी जानेवारी महिन्यात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्राहक पंचायतचे अध्यक्ष विजय लाड, राज्य सचिव अरुण वाघमारे यांच्यासह जिल्हा ग्राहक पंचायतचे उपाध्यक्ष दिलीप लाड, संघटक संजय देशपांडे, सचिव अनंत वाघमारे, शंकरराव सवादे, श्रीमती