Home भंडारा लाडक्या बहिणीचा भाऊ कुठे गेला ? महिलांची गावागावात एकच चर्चा !भाऊ पैसे...

लाडक्या बहिणीचा भाऊ कुठे गेला ? महिलांची गावागावात एकच चर्चा !भाऊ पैसे खात्यात केव्हा जमा करणार ?

255

आशाताई बच्छाव

1001042214.jpg

लाडक्या बहिणीचा भाऊ कुठे गेला ?
महिलांची गावागावात एकच चर्चा !भाऊ पैसे खात्यात केव्हा जमा करणार ?

 

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील महायुती सरकारने एकनाथ शिंदे, देवेंद्र फडवणीस व अजितदादा पवार यांच्या सरकारने आमची सरकार पुन्हा 2024 मध्ये सत्तेत आल्यास हा तुमच्या लाडका भाऊ तुम्हाला पंधराशे रुपये नाही तर 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा करणार !हा वचननामा सरकारने दिला होता. 20 नोव्हेंबरला मतदान झाले आणि 23 तारखेला मतमोजणी झाली या मतमोजणी मध्ये सरकारला स्पष्ट बहुमत दिले. सरकारला बहुमत दिले असले तरी महायुतीमध्ये सामंजस्य बरोबर नसल्याने सत्ता स्थापनेसाठी पंधरा दिवस लागले फक्त पक्षनेतेपदी निवड झालेल्या प्रमुखांची त्यात देवेंद्र फडवणीस यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी म्हणून निवड झाली .तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे ,अजितदादा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली व त्यांना राज्यपालांच्या उपस्थितीत गोपनीयतेची शपथ देण्यात आली.परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यास अजून विलंब लागत आहे. परंतु आमच्या महिला भगिनी यांनी ज्या विश्वासाने महायुती सरकारला मतदान केले त्या महिला आमच्या खात्यात 2100 रुपये केव्हा जमा होणार अशी आतुरतेने वाट बघत आहेत व महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एकच चर्चा रंगत आहे की, महायुती सरकार आमच्या खात्यात 2100 रुपये केव्हा टाकणार याकडे आतुरतेने वाट बघत आहेत.

Previous articleमोबाईल पेक्षा ग्रंथ वाचनास प्राधान्य द्या : उपविभागीय अधिकारी  डॉ.श्रीमंत हारकर
Next articleजैश-ए-मोहम्मदशी संपर्कात असल्याच्या संशयावरून अमरावतीच्या तरुणाला राष्ट्रीय तपास यंत्रणे कडून अटक.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.