Home जालना .. तर लाडक्या बहिणींना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडणार – मा.आ.कैलास गोरंटयाल

.. तर लाडक्या बहिणींना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडणार – मा.आ.कैलास गोरंटयाल

96

आशाताई बच्छाव

1001038801.jpg

.. तर लाडक्या बहिणींना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडणार – मा.आ.कैलास गोरंटयाल
—————————————-
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) लाडकी बहिण योजनेचे निकष बदलण्याच्या हालचाली शासनस्तरावर होत आहेत. मात्र, सदर योजनेच्या निकषात बदल केल्यास लाडक्या बहिणींना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा मा.आ.कैलास गोरंटयाल यांनी दिला आहे.
राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत पराभव अटळ असल्याच्या भीतीमुळे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचे निकष निश्चित करतांना सत्ताधारी पार गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे प्रामुख्याने दिसून आले. या गोंधळाच्या स्थितीमुळेच योजना सुरू केल्यानंतरही निकषात अनेकवेळा बदल करण्याची नामुष्की राज्यकर्त्यांवर ओढवली अशी टीका गोरंटयाल यांनी केली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना राज्यात सरकार आल्यास प्रतिमहा १५०९ रूपया ऐवजी २१०० रुपये देण्याची घोषणा राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी निवडणूक प्रचारा दरम्यान केली आणि आपल्या पदरात राज्यातील लाखो महीला भगिनिंचे मतदान पाडून घेतले. या लाडक्या बहिणींच्या बळावरच राज्यात महायुतीने पुन्हा एकदा सत्ता हस्तगत केली असतांना सत्तेवर येण्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल करण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्या निकषानुसार लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला त्याच निकषानुसार पात्र महीला भगिनींना योजनेचा लाभ देवून महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशी मागणी करून जर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल करण्याचा प्रयत्न केला तर याच लाडक्या बहिणींना सोबत घेऊन , आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Previous articleहिंगोलीत नाँयलान मांजाची विक्री; गुन्हा दाखल
Next articleसहकार महर्षी बाळासाहेब पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त दंतरोग शिबिर संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.