Home भंडारा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये नंदलाल पाटील कापगते विद्यालयाचे सुयश

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये नंदलाल पाटील कापगते विद्यालयाचे सुयश

98

आशाताई बच्छाव

1001030527.jpg

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये नंदलाल पाटील कापगते विद्यालयाचे सुयश

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी ) नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथील कु.अक्षरा कोमेद कापगते हिने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये यश संपादन करून जिल्हास्तरावर निवड करण्यात आली.
शिक्षण विभाग पंचायत समिती साकोली आणि अकॅडमीक हाईट पब्लिक स्कूल साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दोन दिवसीय दिनांक 7 डिसेंबर 2024 ते 8 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले होते.
विज्ञान प्रदर्शनीचा मुख्य विषय “शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान” हा असून यामध्ये तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला असून यामध्ये प्राथमिक गट व माध्यमिक गट तयार करून विज्ञान प्रतिकृती चे परीक्षण करण्यात आले.
यामध्ये नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथील कु.आकांक्षा कोमेद कापगते प्राथमिक गटातून द्वितीय क्रमांक प्राप्त करून जिल्हास्तरावर भरारी घेतली आहे तसेच माध्यमिक गटातून प्रथमेश हेमंत कुंभरे विज्ञान प्रदर्शनी मध्ये सहभाग घेतल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. याकरिता विज्ञान शिक्षक के.एम. कापगते, आर.सी.बडोले, डी.आर.देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापिका आर.बी.कापगते यांनी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदनस्पद कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

Previous articleवाटे हळूहळू चाला मुखाने राम राम बोल सिद्ध साक्षी आनंद धाम किटाळीचा चित्तवेधक उपक्रम
Next articleभारतीय सैनिकाचा स्तुत्य उपक्रम, महापुरुषांना स्मरुण ‘सत्यशोधक पध्दतीने गृहप्रवेश’
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.