आशाताई बच्छाव
सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घ्या या मागणीसाठी शहर
जिल्हा काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहीमेला जोरदार सुरुवात
प्रत्येक वार्डात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येईल- शेख महेमूद
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ)- सर्व निवडणुका मतपत्रिका (बॅलेट) पेपरवर घेण्यात याव्यात या मागणीसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने स्वाक्षरी मोहीम सुरु करण्याचा आदेश जारी केल्याने आज गुरुवार रोजी जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने स्वाक्षरी मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. जालना शहरात गुरुवार रोजी खा . डॉ. कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखाली जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पक्ष कार्यालय रेल्वे स्टेशन रोड, जालना येथे स्वाक्षरी मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये सामान्य नागरिकांनी उत्स्फुर्त भाग घेतला. ही मोहीम दि.20 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.
यावेळी बोलतांना जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी सांगीतले की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. मल्लीकार्जुन खरगे यांनी इव्हीएम मशीन हटवून मतपत्रिका (बॅलेट) पेपरवर मतदान घ्या, अशी मागणी केंद्रिय निवडणूक आयोगाकडे केली आहे. काँग्रेसपक्ष राज्यात या बाबतीत स्वाक्षरी मोहीम राबवून राज्यात प्रदेशाध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने स्वाक्षरीचे निवेदन देणार आहे. शेख महेमुद पुढे म्हणाले की, शहरातील प्रत्येक वार्डात ही मोहीम राबविण्यात येणार असून, काँग्रेस आघाडी व सर्व सेलचे पदाधिकारी यांचा सक्रीय सहभाग राहणार आहे. यावेळी माजी गटनेते गणेश राऊत यांनी बोलतांना सांगीतले की, शहरातील झोपडपट्टी भागात ही स्वाक्षरी मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येईल.