Home भंडारा संत तुकाराम सभागृह भंडारा येथे विविध ओबीसी संघटनेची सभा संपन्न

संत तुकाराम सभागृह भंडारा येथे विविध ओबीसी संघटनेची सभा संपन्न

33
0

आशाताई बच्छाव

1000792107.jpg

संत तुकाराम सभागृह भंडारा येथे विविध ओबीसी संघटनेची सभा संपन्न

 

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) दिनांक 28 सप्टेंबर 2024 ला संत तुकाराम सभागृह भंडारा येथे विविध ओबीसी संघटनांची बैठक सदानंद ईलमे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .येत्या 5 ऑक्टोबर 2024 ला ओबीसी संवाद यात्रा भंडारा येथे दुपारी 1 वाजता येणार असून

त्या अनुषंगाने ही बैठक करण्यात आयोजित करण्यात आली होती. ओबीसी समाजाकरिता 21 दिवस

उपोषण करणारे रवींद्र टोंगे यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी येणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिन राजूरकर आणि प्रमुख वक्ते ऋषभ राऊत हे भंडारा येथे
येणार आहेत . 5 ऑक्टोंबर सभा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 वाजता सभा आयोजित करण्यात आलेली आहे. सभेमध्ये ओबीसी जन गण परिषद, ओबीसी सेवा संघ ,राष्ट्रीय ओबीसी महासंघ ,ओबीसी जागृती मंच, संविधान संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे . यावेळी ओबीसी सेवा संघाचे गोपाल सेलोकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मुकेश पुडके, माजी शिक्षणाधिकारी के झेड शेंडे ,भगीरथ धोटे, बाळकृष्ण सार्वे, वामन गोंधळे , संविधान बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अध्यक्ष रोशन जांभुळकर ,माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे ,उमेश सिंगनजुडे,रोशन उरकुडे,अरुण लुटे ,भावराव साळवे ,विष्णुदास गुणवंत पंचबुधे,मोरेश्वर तिजारे ,बंडू गंथाळे ,संजीव भांबोरे , अरुण गावंडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते, यावेळी संविधान संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभुळकर यांनी सदर प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले की, अनुसूचित जातीचे जे आश्रम शाळा आहेत त्यांना मागील पंधरा वर्षापासून अनुदान मिळाले नसल्याने खंत व्यक्त केली .त्याचप्रमाणे माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी अनुसूचित जातीच्या आश्रम शाळा बंद पाडण्याचा शासनाचे छडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे .

Previous articleसंत तुकाराम सभागृह भंडारा येथे विविध ओबीसी संघटनेची सभा संपन्न
Next articleजैविक शेती मार्गदर्शन व चर्चासत्र कार्यक्रमात शेतकऱ्यांचा मोठा सहभाग
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here