Home जालना महिलांनी स्वसंरक्षणासाठी आपल्या बॅग, पर्स मध्ये क्रिम पाॅंडस लिपीस्टिक ऐवजी मीरची पुड...

महिलांनी स्वसंरक्षणासाठी आपल्या बॅग, पर्स मध्ये क्रिम पाॅंडस लिपीस्टिक ऐवजी मीरची पुड ठेवावी –

131

आशाताई बच्छाव

1000768735.jpg

  1. महिलांनी स्वसंरक्षणासाठी आपल्या बॅग, पर्स मध्ये क्रिम पाॅंडस लिपीस्टिक ऐवजी मीरची पुड ठेवावी – प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा
    जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
    दिनांक 22/09/2024
    राज्यातील महिलांनी स्वसंरक्षणासाठी आपल्या जवळ असलेल्या बॅग, पर्स मध्ये क्रिम पाॅंडस लिपीस्टिक ऐवजी मीरची पुड ठेवावी असे आवाहन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी अधिवेशनात उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांना केले आहे.
    दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्य साधून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे दोन दिवशीय 14 वे राष्ट्रीय अधिवेशन लातूर येथेमोठ्या थाटात संपन्न झाले आहे.
    या राष्ट्रीय अधिवेशनासाठी जम्मू काश्मीर सह भारतातील सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय पातळीवरील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या अधिवेशनात 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने विर माता, विर पीता,विर पत्नी, वीर जवान,यांचा यथोचित सन्मान अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमासाठी उपस्थित अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी महिला पदाधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.तर देशातील राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारी व राज्य पातळीवरील अनेक पदाधिकारी मान्यवरांची उपस्थिती होती.सध्या राज्यात तसेच देशातील घडत असलेल्या बलात्काराच्या घटना विनयभंगाच्या घटना याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.त्यांनी महिलांना काही महत्त्वाच्या सुचना यावेळी केल्या.त्यांनी सांगितले की, महिलांनी आता आपल्या पर्स या बॅगमध्ये फेयर ऍंड लव्हली किंवा लिपीस्टिक न ठेवता मीरची पुड ठेवावी आणि एखादा व्यक्ती आपल्याकडे वाईट नजरेने पाहत असेल तर त्याचा अंदाज ओळखून मीरची पावडरचा वापर करावा.कारण महिलांना कोण व्यक्ती कसा आहे याचा अंदाज लवकर येतो त्यामुळे पुढचा अनर्थ घडण्या अगोदरच आपण आपल्या तयारीत राहाण्याच आवाहन त्यांनी महिलां पदाधिकारी यांना केले.पोलीस केंव्हा येईल आणि कारवाई कधी होईल याची वाट न पाहता महिलांनी स्वतः अॅक्शन घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.पोलीसांची वाट पाहत बसण्यापेक्षा गुन्हेगारांना वेळीच धडा शिकवला पाहिजे यासाठी संघटना आपल्या पाठीशी सदैव उभी असल्याचा विश्वास अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांना यावेळी दिला.